*श्री .सोहमनाथ विद्यालय उमरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा* कारंजा( घा )/प्रतिनिधी :पियुष रेवतकर
- CT India News
- Mar 1, 2022
- 1 min read
*श्री .सोहमनाथ विद्यालय उमरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा*
कारंजा( घा )/प्रतिनिधी :पियुष रेवतकर.
कारंजा (घा ):-कारंजा तालुक्यातील श्री .सोमनाथ विद्यालय उमरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा .सी .व्ही रमण यांचे संशोधन "रमण परिणाम" या शोधा बद्दल दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो .श्री सोहमनाथ विद्यालय उमरी येथे प्रा .डॉ .किरण भुयार यांच्या उपस्थित विज्ञान दिन साजरा करण्यात आला .नैसर्गिक साधन संपत्ती चे संवर्धन या विषयी प्रकल्प प्रगती रबडे यांनी सादर केला .विविध विज्ञान प्रयोग सादर करण्यात आले .वैज्ञानिक हेच खरे देव ,संतांचा वैज्ञानिक दृष्टिकोन व वैज्ञानिक यांनी लावलेल्या संशोधन या मुळेच मानव अधिक सुखी व समृद्ध झाला आहे असे मत डॉक्टर किरण भुयार यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाचे संचालन रेशम देशमुख तर आभार देवयानी कालभुत यांनी केले .यावेळी डॉक्टर किरण भुयार ,सामाजिक कार्यकर्ते उमेश पाचपोहर ,मुख्यधापक राजकुमार तिरभाने ,मनीषा ढोले शाळेतील शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते .









Comments