शिल्लेगाव पोलिसांनी आवळल्या कुख्यात दरोडेखोरांच्या मुसक्या.... आज रोजी पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील
- CT India News
- Jun 29, 2021
- 1 min read
CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनीष मुथा.
शिल्लेगाव पोलिसांनी आवळल्या कुख्यात दरोडेखोरांच्या मुसक्या....
आज रोजी पोलीस ठाणे शिल्लेगाव हद्दीतील परिसरात व इतर ठिकाणी चोरी, दरोड्यासारखे गुन्हे करून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांची शिल्लेगाव पोलिसांनी गुप्तरीत्या माहिती काढुन त्यांचा पाठलाग करून 1.ताराचंद विरुपन भोसले 2. शक्तूर भोसले दोघे रा. गाजगाव, ता. गंगापूर यांना पकडले. या गुन्हेगारांनी पोलीस ठाणे शिल्लेगाव, वैजापूर, वाळूज,गंगापूर हद्दीत चोरी, जबरी चोरी, दरोड्याचा टाकण्याचा प्रयत्न करणे , दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे केलेले असून ते वरील पोलीस ठाणे येथे पाहिजे व फरारी म्हणून घोषित आहेत.
वरील कारवाई मा.पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे, पोलीस अंमलदार रमेश अफसनवाड, सविता वरपे, मनोज नवले, विठ्ठल जाधव, मनोज औटे, सचिन चव्हाण, शुभम पालवे, संतोष गिरी यांनी केली आहे









Comments