top of page

शिल्लेगाव पोलिसांनी पतीच्या निधनानंतर निराधार झालेल्या महिलेला दिली माहेरची ऊब ....

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jul 7, 2021
  • 2 min read

CT INDIA NEWS गंगापुर तालुका प्रतिनिधी . मनीष मुथा शिल्लेगाव पोलिसांनी पतीच्या निधनानंतर निराधार झालेल्या महिलेला दिली माहेरची ऊब .... पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर व शिल्लेगांव पोलीसांनी दिला आधार ..... निराधार महिलेला साडी तर मुलांना कपडे देऊन एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य , किराणा सामान , गहू , तांदूळ दिले भेट ...... औरंगाबाद जिल्ह्यात मागील काही दिवसापासून ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाने औरंगाबाद ग्रामीण अखत्यारीतील पोलीस ठाणे हद्दीतील निराधार महिलांना , मुलांना , वयोवृद्ध लोकांना ( बेघर लोक ) पोलीसांची सामाजिक बांधीलकी म्हणुन योग्य ते जीवनूपयोगी साहीत्य देवून पोलीसांची जनमाणसात प्रतीमा उंचवावी या हेतुने विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागात सामान्य जनतेच्या मनात त्यांनी घर केले आहे व पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे . ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या प्रेरणेतून शिल्लेगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांनी त्यांच्या हददीत दि . १५ जून रोजी बेघर असलेले महीलेचे पती राजु रघुनाथ गिरी हे मयत झाले होते त्यावरून शिल्लेगाव पोलीस स्टेशन येथे आ.म.नं. ३७/२१ कलम १७४ सी.आर.पी.सी. प्रमाने तक्रार दाखल झाली होती सदर महिलेचा पती मृत झाल्यानंतर चौकशी मध्ये महीलेस व मुलाना सदर ठिकाणी कोणीही नातेवाईक अगर इतर आधार नाही पती मयत झाल्याने निराधार महीलेस कामाला जाता आले नाही घरातील सर्व साहीत्य व पैसे संपल्याने उपासामारीची वेळ आल्याचे नवनियुक्त पोलीस अंमलदार हनुमंत सातपुते यांना समजताच त्यांनी पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या कानावर ही बाब घातली कर्तव्यदक्ष असणारे पोलीस निरीक्षक खांडेकर यांनी लगेच सामाजिक बांधीलकी म्हणुन निराधार महीलेस व तिच्या मुलास या समाजामध्ये जगण्यासाठी आधार म्हणुन व पुन्हा ती महीला नव्या उम्मेदीने जीवन जगावे महीलेला सामाजिक आणि विशेषतः महिलेचे मनोधोर्य खचून न जाता वाढावे या उद्देशाने आज दि .०६ जुलै रोजी बेघर महीलेस व तिच्या दहा वर्षाच्या मुलास बोलावून महिला पोलीस अंमलदार सविता वरपे / पिंगट यांचे हस्ते महीलेस दोन साड्या , मुलाला ड्रेस , एक महीना पुरेल इतके किराणा सामान , गहु , तांदुळ भेट देवून जनसामान्य विषयी व निराधार महीले विषयी सामाजिक बांधीलकी जपली यामुळे खाक्या वर्दीतही सामान्य जनतेचे दुःख जाणणारे दर्दी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून खाक्या वर्दीविषयी व पोलिसांविषयी आपुलकी निर्माण झाली असून परिसरातील गावात शिल्लेगाव पोलिसांचे कौतुक होत आहे .

Comments


bottom of page