top of page

-शिवना नदीवरील पूल नवरात्रोउत्सव पर्यंत बनवला नाही तर जलसमाधी घेणार......डॉ.शीतल अग्निहोत्री

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 8, 2020
  • 1 min read

ree

CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी. मनिष मुथा

शिवना नदीवरील पूल नवरात्रोउत्सव पर्यंत बनवला नाही तर जलसमाधी घेणार......डॉ.शीतल अग्निहोत्री

गंगापूर/वैजापूर तालुक्याला जोडणारा शिवना नदिवरील पूल धोकादायक बनला असून मराठवाड्याची कुलस्वामिनी असणारी देवी दाक्षायानीचा नवरात्रउत्सव सतरा आक्टोबरला चालू होत असून लासुर स्टेशन,दायगाव,धामोरी,नांगरे बाभूळगाव,माळीवाडगाव,डोनगावसह पंचक्रोशीतील महिला,पुरुष, लहान मुले,भाविक भक्त पहाटे नऊ दिवस पायी देवी दर्शनाला येत असतात परंतु या मंदिरापर्यंत जायला शिवना नदीवरील पूल धोकादायक झाला असून खड्डे पडले आहेत व या खड्यात पाय पडून एक 8 वर्षीय मुलगा महिनाभरापूर्वी पाण्यात बुडुन करून अंत झाला कारण या नदीवरील शिवना टाकळी धरण शंभर टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग अद्यापही चालू असल्याने या पुलावरील खड्डे दिसत नसल्याने या खड्ड्यात मोटरसाईकल,चारचाकी गाड्या,शेतकऱयांच्या बैलगाड्या रोजच आदळत असून किरकोळ अपघात घडत असून लवकरच नवरात्रोउत्सव सुरु होत असल्याने काही दुर्दैवी घटना घडू नये म्हणून केशरिया हिंदू वाहिनीने प्रशासनाला इशारा दिला आहे की जर नवरात्रोउत्सव चालू होईपर्यंत जर या पुलाची दुरुस्ती होऊन खड्डे बुजवले नाही तर याच जलाशयात जलसमाधी घेण्याचा इशारा केशरिया हिंदू वाहिनीच्या राष्ट्रीय अद्यक्ष डॉक्टर शीतल अग्निहोत्री यांनी दिला आहे.

दरम्यान या वेळी केशरिया हिंदू वाहिनीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डाँ.शितल अग्निहोत्री , प्रदेश प्रवक्ता कैलास कुऱ्हाडे, युवा प्रदेश अध्यक्ष ओम अग्निहोत्री , प्रदेश प्रचारक विष्णुपंत अग्निहोत्री, प्रदेश प्रभारी गुलाब वाघ , जिल्हा आयटी प्रमुख अजय पाडसे ,जिल्हा जनसंपर्क प्रमुख विनोद त्रिभुवन, जिल्हा सचिव शिला कुंभकर्ण ,जिल्हा प्रचारक सविता सोनवने ,गंगापुर तालुका संघटण मंत्री अर्चना नाडे, जिल्हा प्रचारक पुजा अग्निहोत्री आदींसह पदाधिकाऱयांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

Comments


bottom of page