शिवसैनिकांनी वाचवले जखमी तरुणाचे प्राण
- CT INDIA NEWS

- Mar 9, 2020
- 1 min read

वार्ताहार -मनिष मुथा लासुर-सदासुखजि मुथा लासुर स्टेशनशिवसैनिकांनी वाचवले जखमी तरुणाचे प्राण
काल राञी १२ वाजता संभाजीनगर वरून लासुरस्टेशन शिवसेना शहर प्रमुख नितीन कांजुने व सहकार्यांना गोलवाडी एस क्लबच्या अलीकडे रोडवर गर्दी दिसली. तर एका तरुणाला गाडीने उडवलेलं होतं जखमी अवस्थेत पडलेला तरुण
बघणारे बघतच होते पण मदतीला कुणीही येत नव्हतं मग त्यांनी गाडी थांबवली तर डोक्यातुन रक्त स्राव होत होता गाडीतील भगवी शाल काडून त्या तरूणाच्या डोक्याला बांधली आणि १०८ रुग्णवाहिके ला कॉल केला पण कॉल लागला नाही रिक्षा वाल्याला थांबवन्याचा प्रयत्न केला पण तेही थांबण्यास तयार नव्हते पण एक रिक्षा वाला बळजबरी थांबवून त्यात त्या तरुणाला टाकले तेवढ्या मधे वाहतूक पोलीस शाखेची गाडी आली त्यांच्या सोबत त्या तरुणाला घाटी रूग्णालय येथे पाठवले यावेळी उपशहरप्रमुख अमोल शिरसाठ,आदेश रणेयवले,रोहीत वाळके आदींनी मदत केली







Comments