top of page

शिष्यवृत्ती फॉर्म भरताना दोन विद्यार्थ्यांना मारहाण

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 5, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहार -सागर खंडागळे-औरंगाबाद-शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताना रांगेत येण्यास सांगितल्यामुळे गांधीनगर येथील पिता-पुत्राने मित्रांसह दोन विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. औरंगपुरा येथील सरस्वती भुवन कॉलेजच्या आवारात हा प्रकार घडला. मारहाणप्रकरणी कृष्णा नंदकिशोर मिसाळ (वय १८, रा. बेगमपुरा) याने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कृष्णा बीसीएच्या प्रथम वर्गात शिक्षण घेतो. मंगळवारी दुपारी एक वाजता कृष्णा आणि त्याचा मित्र अमनदीपसिंग महेंद्रसिंग राजपूत हे दोघे शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी यश रिडलॉन (रा. गांधीनगर) चे वडील आले. रिडलॉन रांगेत उभे न राहता थेट खिडकीपाशी आले व मला फॉर्म द्यायचा आहे असे सांगत राजपूत याच्यासोबत अरेरावी केली. यावेळी राजपूत त्यांना समजावून सांगत असताना रिडलॉन याने 'तू मला ओळखत नाहीस मी कोण आहे, माझा मुलगा आला तर तुला खूप मारेल', अशी धमकी दिली. कृष्णा आणि राजपूत यांनी सरांना हा प्रकार सांगितला आणि पुन्हा रांगेत आले. यावेळी रिडलॉनने 'बघ माझा मुलगा आला', असे म्हणत मुलगा यश आणि त्याच्या मित्राला कृष्णा आणि राजपूतला मारण्याबाबत चिथावले. यानंतर तरुणांनी शिवीगाळ करीत कॉलेजच्या आवारात कृष्णा आणि राजपूतला मारहाण केली. या प्रकरणी आरोपी यश रिडलॉन, त्याचे वडील, भंडारी नावाचा तरुण आणि अन्य दोन अनोळखी आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप आरोपी मोकाट असून, त्यांना अटक करण्याबाबत क्रांतीचौक पोलिस टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे

Comments


bottom of page