top of page

शासनाचा सर्वात मोठा निर्णय दिव्याग व्यक्ति यांना मिळाला न्याय प्रत्त्येक दिव्याग व्यक्ती

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 5, 2021
  • 2 min read

शासनाचा सर्वात मोठा निर्णय


दिव्याग व्यक्ति यांना मिळाला न्याय प्रत्त्येक दिव्याग व्यक्तीला मिळणार शिधापत्रिका .

दिव्याग व्यक्ति समाजात एक सहानुभूतीने विचार करण्याचा वर्ग आहे . तीन चाकी सायकल , पाटावरून , कुबड्या , घेऊन चालणारे . काठीच्या आधाराने , कृत्रिम अवयव , वापरुन आपली कामे करणारे . मदतीसाठी दुसर्याची वाट केवीलवाने चेहरे करून बघताना आपणास दिसतात . आधार कार्ड नोंदणी , सर्कल चौकशी , तहसिलदार कार्यालयात पेन्शन , योजना , यासाठी आॅफिस मध्ये चौकशी करणेसाठी जाता येत नाही .

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर चे वतीने वेळोवेळी निवेदने व संदेश पाठवून दिव्याग व्यक्तिच्या अडचणी मांडल्या आहेत . पण कोणत्याही कार्यालयाने याचा विचार केला नाही . त्यांना अधिकारी व कर्मचारी यांना भेटण्यास जाता येत नाही . तर प्रत्त्येक दिव्याग कल्याणकारी आॅफिस मध्ये , दिव्याग सहाय्यता करणेसाठी एक एक कर्मचारी नेमण्यात यावेत .

शासनाने या सर्व गोष्टींचा अभ्यास करून व सर्वे करून दिव्याग लोकांना काही काम धंदा करता येत नाही . म्हणून त्यांचा अन्न , धान्य याचा प्रश्न सुटावा यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडून वेळोवेळी म्हणजे .

दि. ५-११-१९९९

दि. ८-८-२००१

दि . २५-५-२००५

दि . २९ जून २०१३

दि. १७ डिसेंबर २०१३

दि .२१ डिसेंबर २०२०


अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ नुसार ग्रामीण भागात (४ लाख ६ हजार ९७१ ) शहरातील लोकांच्या साठी (२ लाख ३०हजार ४५ ) अशी एकूण (७ लाख १६ ) लाभार्थी संख्या निश्चित केली आहे . अंत्योदय योजना, बीपीएल , सर्व दिव्याग व्यक्तिचा समावेश करणेसाठी १ फेब्रुवारी २०१४ नुसार सर्व राज्यांत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत .

अन्न सुरक्षा कायदा २०१३ नुसार अन्न धान्य याचा लाभ मिळवण्यासाठी ज्या दिव्याग व्यक्तिंना रेशनकार्ड हवे आहे . अशा सर्व दिव्याग बांधवांनी संबंधित कार्यालयात नवीन रेशनकार्ड मिळणे साठी अर्ज करावा .दिव्याग व्यक्ति कडून नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर शासनाने निश्चित केल्याप्रमाणे पात्र दिव्याग व्यक्तिंना नवीन शिधापत्रिका वितरण करण्यात यावे , व त्यांच्या समावेश प्रधान लाभार्थी कुटुंब योजनेत त्वरित करण्यात यावा अशी तरतूद शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे .

तरी सर्व दिव्याग बांधवांनी आपल्या जवळच्या तहसिलदार कार्यालय येथील पुरवठा विभागासी आजच संपर्क साधावा . काही अडचण आल्यास खालील नंबरवर फोन करा .


बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर ,

संस्थापक अध्यक्ष :- अहमद नबीलाल मुंडे .



रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा.

रेशन कृती समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा .

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा.

९८९०८२५८५९


प्रचार व प्रसार समाजसेवा जनप्रबोधन ,वाचन ,लेखन संबोधन, प्रबोधन, आणि नेतृत्व करणेसाठी आपल्या गावात तालुका , जिल्हा , राज्य , येथून पदाधिकारी नेमणे आहे .

तरी इच्छुक उमेदवारांनी आधार कार्ड झेरॉक्स , एक फोटो व कागदपत्रांच्या माहीती व आमचें कामा संदर्भात माहिती घेणे साठी वरिल फोन नंबर वर फोन करून संपर्क साधावा .

Comments


bottom of page