top of page

शहराध्यक्षपदासाठी शिरीष बोराळकर व जिल्हाध्यक्षपदासाठी औताडे यांच्या नावाची चर्चा

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 22, 2019
  • 2 min read

ree

प्रतिनिधी आकाश हिवराळे :-लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यात प्रदेश कार्यालयातर्फे काही संघटनात्मक काही संघटनानत्मक बदल करून नवीन नियुक्‍त्या केल्या आहेत. यामध्ये औरंगाबादच्या शहराध्यक्षपदी शिरिष बोराळकर आणि जिल्हाध्यक्षपदी उपमहापौर विजय औताडे यांची निवड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे; मात्र या चर्चेला कुठलाही आधिकृत दुजोरा मिळाला नाही. दोघांचे नाव असलेली एक यादी सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. भाजपचे विद्यामान शहराध्यक्ष म्हणून किशनंद तनवाणी; तर जिल्हाध्यक्ष म्हणून एकनाथ जाधव काम पाहात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षातर्फे विविध नियुक्‍ता करण्यात आल्या आहेत. यात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुभाष भामरे,किरीट सोमय्य, प्रविण पोटे पाटील, योगेश गोगावले,अशोक कांडकलकर यांची नियुक्‍त्या करण्यात आल्या. यासह नवीन प्रवक्‍ते आणि संपर्कप्रमुखाचीही निवड करण्यात आल्या आहेत. तसेच जालना येथील जिल्हाध्यक्ष रामेश्‍वर भांदरगे यांच्या ऐवजी आमदार संतोष दानवे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. यासह नाशिक शहराध्यक्षपदी गिरीष पालवे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीत औरंगाबादचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष बदलण्यात आल्याची चर्चा दुपारपासून औरंगाबादेत सुरु होती. यात शहराध्यक्षपदी भाजप प्रदेश प्रवक्‍ते शिरिष बोराळकर यांची तर जिल्हाध्यक्षपदी विजय औताडे यांची निवड झाल्याची चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांने सुरु होती. या दोघांचे नावे असलेली एक यादीही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. याच व्हायरल यादीनुसार बोराळकर आणि औताडे यांची निवड झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यादीत नाव असलेले शिरिष बोराळकर म्हणाले. "शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे फोन येत आहेत; मात्र माझ्यापर्यंत कुठलीही यादी आलेली नाही. तसेच माझे नाव होल्डवर ठेवण्यात आले आहे.'' तर जिल्हाध्यक्षपदाची जबाबादारी मझ्यावर टाकण्यात आल्याचे उपमहापौर विजय औताडे यांनी सांगितले. विद्यामान जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव म्हणाले जिल्हाध्यक्षपदी नवीन निवड झाल्याचे कानावर आले आहे. मात्र माझ्यापर्यंत कुठलीही यादी आलेली नाही. यासह विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी म्हणाले,शहराध्यक्षात कोणतेही बदल झाले नाही. असे कुठेलही पत्र माझ्यापर्यंत आले नाही. कुठला निरोपही मिळालेला नाही. तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ.भागवत कराड म्हणाले, शहराध्यक्षपदासाठी शिरीष बोराळकर व जिल्हाध्यक्षपदासाठी औताडे यांच्या नावाची चर्चा आहेत. अजून कुठलीही निवड झालेली नाही.

Comments


bottom of page