संगमनेर येथील तांबट समाजाचा शासनाच्या विरोधात एल्गार..
- CT INDIA NEWS

- Oct 11, 2019
- 2 min read

वार्ताहार-संगमनेर-राम रेघाटे-तांबट समाजाच्या नवदुर्गा एकवटल्या ; शासनाच्या विरोधात एल्गार ...परंपरागत व्यवसाय ढबघाईला आला तसेच घरामध्ये कोणासही नोकरी नाही व महागाईमुळे जीवन मेटाकुटीला आल्याने असह्य व हतबल झालेल्या तांबट समाजाच्या महिला वर्गाने सरकारच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला . निवडणुकीच्या काळात आश्वासनाची खैरात केली जाते परंतु त्याची अंमलबजावणीच होत नाही. समाजाच्या मागण्या मान्य करण्यास आम्ही शासनाला भाग पाडू. समाजात जागरण करून एक दिवस संसदेत गोंधळ घालू असा इशारा तांबट समाजाच्या महिलांनी दिला. घराघरात जागृती व नवचेतना निर्माण करण्याचे काम तांबट समाजाच्या महिला करीत आहे. एकसंध विश्वकर्मा समुदायाच्या प्रवाहातील तांबट समाज हा एक घटक असून विश्वकर्मा समाजाचे शासन स्तरावर वर्गवारीनुसार तुकडे झाले आहेत. लोहार व शिल्पकार समाजास एन टी तर सुतार, तांबट, सोनार यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केला आहे. तांबट समाज समुदाय अल्पसंख्य असून विकासापासून कोशो दूर आहे. आर्थिकदृष्टया हातावर अवलंबून असलेला या समाजाने बदलत्या तंत्रज्ञानातही आपला व्यवसाय कसबसा तग धरून ठेवत उदरर्निवाह करीत आहे. यावेळी रजनी पाथरकर यांनी मत व्यक्त कले की एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सरकारी नोकरीत या समुहाचा प्राधान्य क्रमाने विचार होणे गरजेचे आहे.तर प्रियंका म्हाळणकर यांनी शासकीय योजनांची माहिती समाजा पर्यंत पोहचत नाही.असे मत व्यक्त केले.घरकूल सारख्या योजनांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत मीनल नगरकर, साक्षी मिस्किन, अश्विनी तळेकरने सांगीतले. समाजातील सुशिक्षित बेरोजगार नोकरीसाठी व व्यवसायासाठी भटकत असल्याचे प्रभावती आप्रे यांनी व्यथा व्यक्त केली .आज युवावर्ग शिकून बाहेर पडतोय परंतु त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे असे अनसूया मिस्किन यांनी सांगीतले. एकटा कर्ता पुरूष इमाने इतबारे करीत आहे प्रचंड महागाईमुळे त्यास संसाराचा गाडा चालवणे कसरतीचे बनले आहे.त्यामुळे व्यवसायासाठी आर्थिक साह्याची गरज असल्याचे अमृता आप्रे ने सांगीतले. घटस्थापना म्हणजे समाजाच्या विकासाची स्थापना होय.स्त्रीशक्ती चा आदर म्हणजे त्यांच्या मताची कदर .घरातील आदी शक्तींचा सन्मान करणे त्यांच्या समस्या सोडविणे हे शासनाचे कर्तव्य होय. तरच समाज स्वत:ची ओळख निर्माण करेल. जो पक्ष पाठिशी, समाज त्यांच्या मताशी. वैदिक परंपरा जपणारा हा समाज मताचे मूल्य जाणून आहे. त्यामुळे हा मौल्यवान हक्क आम्ही बजावणारच आहोत. नि्डणुकीवर बहिष्कार टाकणे हे सूज्ञ लोकांचे लक्षण नव्हे समाजा तील युवा ,युवतीना प्रेरणा देवून अन्याय सहन न करता आपल्या मुला मुलींना सक्षम करू , समाजाच्या प्रश्नाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास शासनाला त्याची किंमत मोजण्यास भाग पाडू असा इशारा समाज भगीनीने यावेळी दिला . विमल रेघाटे, सुनंदा म्हाळणकर, सुमन नगरकर, गीता म्हाळणकर ,नंदा गोमासे, मनीषा म्हाळणकर ,वैजयंती रेघाटे, शुभांगी नगरकर, सुमन आप्रे, रश्मी म्हाळणकर, सुनिता आप्रे ,मीना दस्तुरकर , सोनाली म्हाळणकर, आदि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.







Comments