सांगली : आटपाडी (सांगली) पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षकालाच सेक्स रॅकेट प्रकरणी अटक झाल्याने खळबळ उ
- CT India News
- Jan 29, 2021
- 1 min read
सांगली : आटपाडी (सांगली) पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षकालाच सेक्स रॅकेट प्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. सदर पोलिस निरिक्षकासह एकुण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघा पिडीत तरुणींची सुटका करण्यात आली आहे. सांगली येथील हॉटेल रणवीर या ठिकाणी सुरु असलेला हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचे केंद्र नेस्तनाबूत करण्यात आले आहे. सांगली ग्रामीण पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी अटकेतील संशयीतांमधे आटपाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण देवकर यांच्यासह हॉटेल मालक राघवेंद्र शेट्टी, एजंट रजेश यादर, शिवाजी वाघले, सत्यजीत पंडीत यांचा समावेश असून पिटा कायद्यानुसार सदर कारवाई झाली आहे. सुरु असलेल्या वेश्या अड्ड्यावर पोलिस निरिक्षकाच्या अटकेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.









Comments