top of page

सांगलीतील अवैध धंदे त्वरित बंद करा

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jan 11, 2020
  • 1 min read

ree

वार्ताहार-तुकाराम सुतार सांगली-सांगली शहरामध्ये करमणुकीच्या नावाने चालू असलेले अवैद्य व्यवसाय उदा. व्हिडिओ गेम च्या नावाने चालु असलेले जुगार, तीन पाणी जुगार, कॅसिनो वर कारवाई करावी या बाबत. मा. पोलीस अधीक्षक श्री सुहेल जी शर्मा साहेब व मा. निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे मॅडम यांना समक्ष भेटून चालु असलेली हकीकत सांगून ते तात्काळ बंद करावेत या साठी अवैध व्यवसाय विरोधी कृती समिती च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. मा.श्री सुहेल शर्मा साहेब यांनी अश्या व्यवसाय ( विडिओ गेम ) जिल्हाधिकारी कार्यालयकडून परवानगी दिली जाते. जर संबंधित दुकानदार यांनी अटी चा भंग करत आहेत की नाहीत हे तपासून कारवाई केली जाईल असे अश्वसन दिले. या अवैध व्यवसाय विरोधात निवेदन देण्यास खास करून युवक वर्ग जास्त गोळा झाले होते. अजून बाकी शहरातील युवकांनी व महिलांनी संसाराची राख रांगोळी होई नये यासाठी पुढाकार घ्यावा. अश्या व्यवसाय विरोधात मोठी चळवळ उभी करूया. सर्वांनी या लढ्यात साथ द्यावी ही विनंती. सामाजिक कार्यकर्ते जयश्रीताई पाटील -सांगली

Comments


bottom of page