सांगली महानगरपालिका क्षेत्रात दिवसभरात मास्क न वापरणाऱ्या 12 व्यक्तीवर कारवाई करण्यात आली
- CT INDIA NEWS

- Sep 16, 2020
- 1 min read

हेडींग:- महापालिका क्षेत्रात सोमवारी दिवसभरात मास्क न वापरणाऱ्या 12 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल एकास 2 हजाराचा दंड करण्यात आला. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनुसार ही कारवाई सुरू आहे. रिपोर्टर:- बाळासाहेब वाघमोडे 9175644543
कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेऊन ती रोखण्यासाठी सांगली मनपाक्षेत्रात जनता कर्फ्यु सुरू आहे. जनता कर्फ्युचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री जयंत पाटील यांनी सुद्धा केले आहे मात्र अजूनही शहरात विनामास्क फिरणाऱ्याची संख्या अधिक आहे. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी मनपा प्रशासनाला दिले होते. यानुसार उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह वरिष्ठ
स्वच्छता निरीक्षक अविनास पाटणकर यांच्यासह स्वच्छता निरीक्षकांच्या टीमकडून मनपाक्षेत्रात मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई सुरू केली होती. यानुसार सांगली आणि कुपवाड मधील 12 व्यक्तीवर मास्क न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाइ करण्यात आली आहे तर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल एकास 2 हजाराचा दंड महापालिकेच्या पथकाने केला आहे. मास्क न वापरणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्याविरोधात ही मोहीम नियमितपणे सुरू राहील त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक खबरदारीच्या उपाय योजनांचा अवलंब करावा असे आवाहन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.







Comments