top of page

संजय अंभोरे हत्या प्रकरण

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Oct 11, 2019
  • 1 min read

ree

संतोष वाहुळे वार्ताहार. संजय अंभोरे हत्या प्रकरण,; बदनापूर ठाण्यात मृतदेह आणून नातेवाकांचा ठिय्या: शेलगाव:बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथील रहिवाशी कंत्राटदार संजय अंभोरे यांची डोक्यात गोळी घालून सोमवारी रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी हत्या करण्यात अली होती.या प्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी रात्री तिघा जणांना ताब्या घेतले आहे. मृत संजय अंभोरे यांनी आपल्या जीवितास धोका आहे असे लेखी स्वरूपाचे पत्र पोलीस प्रशासनास दिल्याचे नातेवाईक यांचे म्हणणे आहे.सबितांवर कारवाई जो पर्यन्त होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. संजय अंभोरे वय बेचाळीस हे शेलगाव येथे रोडच्या बाजूला पान टपरी चालका सोबतरात्री सातवाजून पंचेचाळीस मिनिटाला बोलत उभे होते.त्याच वेळेस दुचाकीवरआलेल्या अनओळखी यक्तींनी त्यांना अगदी जवळून डोक्यात गोळी घातली होती.संबदीत हल्लेखोर जालन्याच्या दिशेने पळून जाण्यास यशस्वी झाले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तीन संशयीतांना पकडण्यात आले आहे.

Comments


bottom of page