top of page

*संत महापुरुषांचे घेऊन ज्ञान, पाचोऱ्याच्या बहुजन समाजाची उंचवली मान,पि.एस.आय.महाजन साहेबांचा सत्कार

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jun 8, 2021
  • 1 min read

*संत महापुरुषांचे घेऊन ज्ञान, पाचोऱ्याच्या बहुजन समाजाची उंचवली मान,पि.एस.आय.महाजन साहेबांचा सत्कार सन्मान,*


*पाचोरा येथे जगतगुरु संत‌ श्री तुकाराम महाराज जन्मोत्सव समिती तर्फे सत्कार करण्यात आला**


पोलीस उपनिरीक्षक पि.एस.आय.मुंबई श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेबांनी, महाराष्ट् लोकसेवा आयोग एम.पी.एस.सी.परीक्षेत 400 पैकी 351 गुण मिळवून, 322 जागांन मधुन 40 व्या रॅंकने उत्तीर्ण झाले असुन, महाजन साहेबांची प्रस्थिति अतिशय हालाखिची होती,अठरा विश्व दारीद्र आई वडील शेत मजुरी करणारे, मोठ्या भाऊंचा चहाचा व्यवसाय स्टॉल वरती वाल्मिक महाजन यांनी, मोठे भाऊ विठ्ठल एकनाथ महाजन यांना चहा स्टाॅल वरती मदत करून,महाजन साहेबांचे शिक्षण पहीली ते सातवी मराठी मुलांची शाळा नंबर 2 मधे झाले, 8 वी ते 10 वी जागृती विद्यालय पाचोरा,12 वी एम एम कॉलेज पाचोरा,येथे घेऊन,तसेच 2012 मधे बी.एस्सी अॅग्री डीग्री यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ नाशिक येथे उत्तीर्ण होऊन,1 जुन 2009 मधे मुबंई पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होऊन, 12 वर्ष सतत अभ्यास करून यश संपादन केल्या बद्दल सत्कार करण्यात आला,सत्कार करताना समितीचे अध्यक्ष.भाऊसो अनिल मराठे,सचिव.राऊतराय सर, सल्लागार‌‌.भाऊसाहेब राजेंद्र पाटील,प्रसिध्दी प्रमुख.श्री दिपक शेवरे,छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष.दादासो रविंद्र पाटील,मायबाप प्रतिष्ठानचे संस्थापक.लहुजी बाविस्कर सर समितीचे प्रवक्ते शाहिर विठ्ठल महाजन यांनी सर्वांचे आभार मानुन आनंद व्याक्त केला, महाजन साहेबांचे सर्व समाजातुन गौरव करण्यात येत आहे

Comments


bottom of page