top of page

*सातारा प्रतिनिधि -जीवन मोहिते हेडीग- राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे*यांच* *निधंन* पुस्तकाचे

  • Writer: CT India News
    CT India News
  • Sep 13, 2021
  • 0 min read

*सातारा प्रतिनिधि -जीवन मोहिते हेडीग- राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब भिलारे*यांच* *निधंन* पुस्तकाचे गाव' भिलारचे सुपुत्र,राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प प्रदेश उपाध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे (वय 72) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्कयाने भिलार (ता.महाबळेश्वर )येथे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. बाळासाहेब भिलारे तथा दादा यांची प्रकृती गेले काही दिवस बरी नव्हती. त्यांच्या निधनाने भिलार,पाचगणीसह महाबळेश्वर तालुक्यावर दु:खाची छाया पसरली.जिल्हातील कार्यकर्त्यांना त्यांच्या अचानकपणे जाण्याच्या वृत्ताने धक्का बसला.




बाळासाहेब भिलारे हे सलग 25 वर्ष भिलारे गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते. राष्टवादी कॉंग्रेसच्या अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. राष्टवादीच्या स्थापनेपासुन ते जिल्हात पक्षवाढीसाठी खरीबपणे कार्यरत पणे राहिले.महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड होती. सर्वांना सोबत घेऊन चालणारा आणि सर्व समाजघटकांना आपला वाटणारा नेता म्हणून त्यांच्या कडे पाहिले जात होते.त्यामुळेच त्यांनी ज्योती जाधवसारख्या तळागाळातील कार्यकर्तीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर बसवले.


सन 2004 ते 08 या कालावधीत राष्टवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यकपद त्यांनी भूषविले.सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते दहा वर्षे संचालक होते.निओजन समितीमध्ये नामनिर्देशित सदस्य ,स्टाॅबेरी उत्पादक महासंघाचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत होते.पाचगणीत त्यांनी हिलरेंज स्कूल स्थापन केले होते.आपल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी शिवजयंतीनिमित्त प्रतापगडावर जिल्हा परिषदेची सभा आयोजित करण्याचा चांगला पायंडा पाडला.त्यांचे वडील एम.आर.तथा मारुती भिलारे हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते.त्यांचा राजकीय वारसा दादांनी पुढे चालवला. कार्यकारी संपादक -श्री तुकाराम सुतार CT INDIA NEWS

Comments


bottom of page