संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी घरीच साजरी करा -शाहीर विठ्ठल महाजन (माऊली)
- CT INDIA NEWS

- Jul 19, 2020
- 1 min read

पाचोरा : प्रतिनिधी-निलेश चौधरी
संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचा 725वा संजीवन समाधी सोहळा १९ जुलै घरी राहूनच साजरा करूया. गेल्या सहा महिन्यापासून जगभरात covid-19 या रोगाने थैमान घातले आहे. आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणात या रोगामुळे लोकांना प्राण गमवावे लागले आहेत आणि हळूहळू ग्रामीण भागात सुद्धा हा रोग पसरू लागलेला आहे.
महाराष्ट्रात संत सावता माळी पुण्यतिथी निमित्ताने अनेक ठिकाणी मोठमोठे पालखी सोहळा व मिरवणूक काढली जाते विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबवले जातात परंतु या कोरोणा महामारीत आपण सर्वांनी श्री संत शिरोमणी सावता माळी यांची पूजा घरीच करून कोरोणा प्रादुर्भाव टाळला पाहिजे असे शाहीर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) जिल्हाअध्यक्ष श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य जळगाव यांनी सर्व समाज बांधवना आव्हान केले आहे .या आधी शाहिर विठ्ठल महाजन यांनी लाॅकडाउन कालावधीत आपल्या गीता च्या माध्यमातून कोरोना महामारी वर जनजागृती केली आहे.







Comments