संतोष चौधरी रावेर यावल येथें पैसे वाटप करणार असे महायुतीचे जगणभाई सोनवणे यांचा दावा
- CT INDIA NEWS
- Oct 18, 2019
- 2 min read

वार्ताहार-संतोष महाले-भुसावळ माजी आमदार संतोष चौधरी हे भुसावळातील आपल्या उमेदवाराकडून रग्गड पैसा घेऊन तो रावेर यावल मध्ये वाटणार असल्याचा आरोप महाआघाडीचे उमेदवार जगनभाई सोनवणे यांनी केल्याने धमाल उडाली आहे तसेच त्याच्या दोन्ही मतदारसंघावरही परिणाम होण्याची शक्यता आहे सतीश घुले यांना संतोष चौधरी यांनी ऐन वेळी धोका दिल्याने तेसुद्धा अपक्ष उभे आहेत अर्थात भुसावळात बहुरंगी लढत होत असून चौधरी यांच्या गटाने आपली सर्व शक्ती डॉक्टर मधु मानवतकर यांच्या पाठीशी उभी केली आहे स्वतः चौधरी हे त्याच्या प्रचाराचे नियोजन करत असून प्रचारात चौधरी समर्थक सहभागी झाले आहे तर दुसरीकडे चौधरींनी आघाडी धर्माला हरताळ पसरल्यामुळे संतप्त झालेले जगन्नाथ व्हाईस सोनवणे यांनी संतोष चौधरी यांनाच टारगेट केले आहे आपल्या प्रचारात ते सातत्याने मांडत असलेला एक मुद्दा हा राजकीय वर्तुळात नव्हे तर सर्वसामान्यांमध्येही चर्चेचा विषय बनला आहे जगनभाईंच्या मते संतोष चौधरी यांच्यासाठी निवडणूक म्हणजे रग्गड कमाई करण्याची सुवर्णसंधी असते गेल्या निवडणुकीत त्यांनी ॲड. राजेश झाल्टे यांना फसवले होते तर आता मधु डॉक्टर मानवतकर यांच्याकडूनही ते मोठी रक्कम घेणार असून हीच रक्कम रावेर विधानसभा मतदारसंघातून उभे असणारे त्यांचे भाऊ अनिल चौधरी यांच्यासाठी वापरणार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे जगनभाई सोनवणे यांच्या आरोपामुळे भुसावळ आणि रावेर विधानसभा मतदारसंघातील समिकरणावर परिणाम होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे सोनवणे यांच्या आरोपांनी मानवत अकात दंपत्या सावध झाले असून ते प्रत्येक पाऊल सावधगिरीने उचलत आहे विशेष करून आर्थिक बाबींमध्ये ते स्वतः लक्ष घालत आहे तर भुसावळ आतून मोठ्या प्रमाणात पैसा येणार असल्याची खबर ही रावेर व यावर तालुक्यातील अनिल चौधरी यांच्या समर्थकांना लागतात त्यांच्या अपेक्षा देखील उंचावल्या आहेत त्यांच्याही डिमांड वाढू लागली आहे आता या दोन्ही घटना एकाच साखळीची जुळलेल्या असल्यामुळे नेमके करावे तरी काय हा पेज डॉक्टर मधु मानवतकर आणि चौधरी बंधू समोर उभा असल्याचे दिसून येत आहे याचा थेट परिणाम भुसावळ आणि रावेर मतदारसंघावर शक्यतादेखील बळावली आहे तर दुसरीकडे चौधरी यांच्या जनाधार आघाडीत उभी फूट पडली असून काही नगरसेवक हे आमदार संजय सावकारेंसोबत काही जगन भाई सोनवणे यांच्यासोबत तर काही डॉक्टर मधु मानवतकर यांच्यासोबत प्रचाराला दिसत आहे. अर्थात निकाल काहीही लागला तरी जगनभाई सोनवणे यांच्या आक्रमक ते मुळे ही निवडणूक अनेक वर्ष स्मरणात राहणार आहे.
Comments