संतश्री जगनाडे महाराज यांच्या मंदिर निर्मिती साठी लक्ष्मी महाकाळ व श्री जयदत्त अण्णा क्षीरसागर
- CT INDIA NEWS

- Jan 12, 2020
- 1 min read

औरंगाबाद,सचिन चौधरी-(प्रतिनिधी)तेली समाजाचे दैवत संतश्री जगनाडे महाराज यांच्या औरंगाबाद शहरात नवनिर्माण मंदिराच्या कार्यासाठी तेली समाजाच्या झुंजार नेत्या सौ.लक्ष्मी महाकाळ/उबाळे यांनी मा.मंत्री तथा अखिल भारतीय तैलीक साहू महासभेचे राष्ट्रीय श्री जयदत्त क्षीरसागर यांची आज औरंगाबाद येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.या वेळी त्या म्हणाल्या की औरंगाबाद शहरात तेली समाज बांधवांची संख्या खूप मोठी आहे.येथील समाज बांधव विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.येथील समाज संघटीत असून तेली समाजाची प्रगती कडे नेत्रदीप घोड दौड सुरू आहे.औरंगाबाद शहारात संत संताजी जगनाडे महाराजांचे मंदिर व्हावे अशी सर्व समाज बांधवांची इच्छा आहे.याच अनुषंगाने जयदत्त आण्णांची भेट घेण्यात आली.या वेळी जयदत्त आण्णासाहेब म्हणाले की हा विषय माझ्या डोक्यात होता.संत जगनाडे महाराज यांच्या मंदिर निर्मितीसाठी मी स्वतः लक्ष घालून पाठपुरठा करिल अशी माहिती सौ.लक्ष्मीताई महाकाळ दिली.







Comments