top of page

सिद्धार्थ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन व वामनदादा कर्डक जयंती साजरी

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 17, 2019
  • 1 min read

ree

औरंगाबाद :- प्रतिनिधी-अमरदिप हिवराळे - मिटमीटा येथील सिद्धार्थ महाविद्यालयात 73 वा स्वातंत्र्य दिन व आंबेडकरी चळवळीतील महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१९ गुरुवार रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी आठ वाजता महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीवर प्राचार्य डॉ. आय.डी. नाथ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. तसेच लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले आणि स्वातंत्र्य दिन उत्सव समारंभाचे औचित्य साधून देशभक्ती पर व वामनदादा कर्डक यांनी रचलेले भीमगीते विद्यार्थ्यांनी सादर केली. व्याख्यानाचेही आयोजण यावेळी करण्यात आले होते, याप्रसंगी प्रा. सुनील जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, श्रीयुत प्रा. पवार सर यांनी यावेळी भारतीय अर्थव्यवस्था व स्वातंत्र्य चळवळ यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,यावेळी प्रा. सुनील मगरे यांनी समाजसुधरकांचे योगदान यावर आपले विचार मांडले, तर अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. आय. डी. नाथ यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य संयोजक डॉ. मिलिंद आठवले यांनी केले,सूत्रसंचालन प्रा. शिलवंत गोपणारायन यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. विनोद अंभोरे यांनी करून दिला.तर आभार राम जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी विशाल पठारे, कल्याण नलावडे, अमर हिवराळे,गौतम खिल्लारे,दिपक पाईकराव व विजय धुळे यांनी प्रयत्न केले.

Comments


bottom of page