स्पेशल स्टोरी | ‘लेडी सिंघम’ आय.पी.एस. मोक्षदा पाटील यांच्याशी लग्नाच्या 'बेडी'त कसे अडकले आस्तिककु
- CT India News
- Feb 9, 2021
- 2 min read
स्पेशल स्टोरी | ‘लेडी सिंघम’ आय.पी.एस. मोक्षदा पाटील यांच्याशी लग्नाच्या 'बेडी'त कसे अडकले आस्तिककुमार पांडेय ?
आय.ए.एस.आस्तिककुमार पांडेय आणि आय.पी.एस.मोक्षदा पाटील यांची प्रेमकथा खुप मजेशीर आहे.
आयएएस अधिकारी आस्तिक कुमार पांडेय आणि आयपीएस अधिकारी मोक्षदा पाटील. एक औरंगाबाद महापालिकेची कमान सांभाळणारा अधिकारी, तर दुसऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या नाड्या हाती असलेल्या ‘लेडी सिंघम’… औरंगाबादमधील महत्त्वाची पदं सांभाळत संसाराची तारेवरची कसरत करणाऱ्या या जोडप्याची प्रेमकथा कशी सुरु झाली, कुठे रुजली आणि कशी बहरली, याची सर्वांना उत्सुकता आहे.
आस्तिक कुमार पांडेय हे औरंगाबादचे महापालिका आयुक्त म्हणून सध्या कार्यरत आहेत. तर औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदाची धुरा मोक्षदा पाटील यांच्या खांद्यावर आहे. बॅचमेट्स असलेल्या पांडेय आणि पाटील यांची प्रेमकथा फारच इंटरेस्टिंग आहे. मोक्षदा पाटील यांचे बालपण मुंबईचे, तर आस्तिक कुमार पांडेय हे उत्तरप्रदेशचे आहे. दोघांची पहिली भेट झाली ती मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीत प्रशिक्षणादरम्यान. 2011 मध्ये तीन महिन्यांच्या फाऊंडेशन कोर्समध्ये ते बॅचमेट्स होते.
राज्यं वेगळी, संस्कृती वेगळी, भाषा वेगळी… दोन भिन्न राज्यातील या होतकरुंची केमेस्ट्री मात्र जुळली. वाचन, इतिहास यासारख्या अनेक आवडी निवडी जुळल्याने दोघांची मैत्री झाली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. अर्थातच मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
एकदा मोक्षदा पाटील यांचे वडील मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीत भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी आस्तिककुमारांनी मोक्षदांच्या वडिलांची भेट घेतली. आपलं प्रेम त्यांनी कबूल केलं. मोक्षदा पाटील यांच्या वडिलांनी चौकशी करुन लग्नाला होकार दिला. अखेर 28 एप्रिल 2012 च्या मुहुर्तावर मोक्षदा आणि आस्तिककुमार लग्नाच्या बेडीत अडकले.
आठहून अधिक वर्षांच्या संसारासोबतच त्यांची कारकीर्दही फुलत गेली, बहरत गेली. दोघंही प्रशासनातील महत्त्वाच्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. साहजिक ताणतणाव पाचवीला पुजलेले. कोरोना काळात दोघांवरही मोठी जबाबदारी होती. परंतु दोघांनी आपली जबाबदारी समर्थपणे पेलली.
“मला कोणीही समजून नाही घेतले तरी आस्तिक मला नक्कीच समजून घेतील आणि मी त्यांच्या पाठीशी ठाम उभी आहे, हा विश्वास आस्तिक यांना आहे” असं मोक्षदा पाटील एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. ‘मी नेहमी त्यांच्या मनात असते’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.









Comments