top of page

सापडलेले सोने दिले परत

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Sep 1, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहर-मनीष मुथा लासुर संस्थेच्या शाखा लासुर स्टेशन (विभाग औरंगाबाद) येथील शिपाईकर्मचारी श्री. महेंद्र स्वरुपचंद कुकलारे हे दिनांक ०५/०४/२०१९ रोजी शाखेचे कामकाज करत असताना सादर स्संस्थेचे सोने तारण कर्जदार सभासद श्री. गोकुल गबजी धूमाळ हे कर्ज खाते क्र १७५/२७२९० कर्ज राशी ५१०००/- निरंक करण्यासाठी आले होते. कर्ज खाते निरंक करून दागिने घेऊन परत जाताना ५ ग्राम वजनाचे सोन्याचे झुंबर टॉप्स जोड शाखेत काऊटर चे खाली पडले व ते निघून गेले. सदर बाब शिपाई यांना दुसऱ्या दिवशी शाखा झाडताना वस्तू सापडली ती वस्तू शिपाई यांनी शाखा व्यवस्थापक यांचे कडे देण्यात आले आणि दि. ०५/०४/२०१९ रोजी निराक झालेल्या संपूर्ण निरंक झालेल्या सोने ता. कर्ज तपासून झुंबर टॉप्स जोड श्री. गोकुळ गबाजी धुमाळ याचे ५ ग्राम चे वस्तू किमत १६०००/- ची वस्तू शाख व्यवस्थापक श्री. सुधीर रामराव साळवे यांच्या हस्ते परत देण्यात आली.

Comments


bottom of page