top of page

सोयगाव नगरपंचायत वर अपंगांनी केले ठिय्या आंदोलन

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Aug 29, 2019
  • 1 min read

ree

वार्ताहर-संदीप इंगळे सोयगाव नगरपंचायत वर अपंगाच्या विविध मागण्या साठी आ. ओमप्रकाश बच्चु यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रहार शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन सोयगाव तालुका अध्यक्ष संदीप (बापु) इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आदोलण करण्यात आले. यावेळी ही नेहमी प्रमाणे मी गैरहजर असलेले मुख्य अधिकारी सचिन तामखेडे हे आजही गैरहजर होते. त्यामुळे अपंग बांधवांनी नाराजी व्यक्त केली. अपंगाचा पाच टक्के निधी वाटप करणे, अपंगाना व्यवसाया साठी शासन परिपत्रकानुसार गाळे वाटप करणे यासह अपंगाच्या विविध मागण्या साठी हे ठिय्या आदोलण करण्यात आले. मुख्य अधिकारी सचिन तामखेडे हे गैरहजर असल्याने आ. बच्चु कडु यांनी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आठ दिवसात निधी वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच याप्रसंगी सचिन तामखेडे यांनी लेखी आश्वासन दिले की दि. ११ सप्टेंबर २०१९ पर्यंत निधी वाटप करण्यात येईल व लवकरच बैठक घेऊन अपंगाना गाळे देण्यात येईल असे लेखी पत्र नगरपंचायत चे प्रशासकीय अधिकारी ए. के. आहेर यांनी दिले. यावेळी प्रसंगी महीला अध्यक्ष मंगला जोहरे, ज्योती गायकवाड, मनिषा भिवसने, संजय मिसाळ, गजानन चव्हाण, कैलास म्हसाळ, प्रकाश होळकर, वाल्मिक साळवे शाताराम बावस्कर, यांच्या सह तालुक्यातील शेकडो अपंग बांधव उपस्थित होते. अपंगाना हक्कासाठी लढावे लागते आहे हे सर्वात मोठे दुर्दैव. आम्ही दि. 13 आगस्ट रोजी निवेदन दिले होते की अपंगाच्या विविध योजनेची अमलबजावणी करण्यात यावी. तरीही मुख्य अधिकारी सचिन तांमखेडे हे आजही गैरहजर होते. ज्याही वेळेस अपंग बांधव तोंडी किंवा लेखी तक्रार करण्या साठी आलो त्यावेळी मुख्य अधिकारी हे एक तर रजेवर किंवा गैरहजर असतात. प्रहार अपंग क्रांती आंदोलन सोयगाव तर्फे मुख्य अधिकारी यांचा निषेध करण्यात आला. तर दि. ११ सप्टें. २०१९ पर्यंत अमलबजावणी नाही झाली तर दि. १२ सप्टें. ला प्रहार स्टाईलमध्ये तिव्र आदोलण छेडण्यात येईल.

Comments


bottom of page