सोयगाव -सिल्लोड विधान सभा क्षेत्रात प्रहार संघेतनेचा कोणत्याही पक्ष किंवा अपक्ष उमेदवारास पाठिंबाना
- CT INDIA NEWS
- Oct 18, 2019
- 1 min read

सोयगाव :- (प्रतिनिधी) संदीप इंगळे... प्रहार अपंग क्रांती आंदोलन व प्रहार सैनिकांची सिल्लोड येथे बैठक संपन्न. बैठकीत कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट. सोयगाव सिल्लोड विधान सभा क्षेत्रात प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार शेतकरी संघटना व प्रहार अपंग क्रांती आंदोलन चा कोणत्याही उमेदारास पांठिबा नसल्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष कृष्णा पाटील व प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे व शांताराम यांनी सांगितले. प्रहारची कुठल्याही पक्षासोबत युती अथवा आघाडी झालेली नाही. महाराष्ट्रात प्रहार चे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ३० ठिकाणी स्वबळावर लढत आहेत. तेव्हा ज्या मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार पक्ष प्रमुख वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी दिलेले आहेत तसेच मतदार संघात सिल्लोड सोयगाव विधानसभा क्षेत्रात पण कोणत्याही पक्ष किंवा अपक्ष उमेदारास पांठिबा नाही जो पर्येंत पक्षप्रमुख आ. बच्चूभाऊ कडू हे कोणाला पांठिबा देत नाही तो पर्यंत कोणालाही पांठिबा देऊ नये असे आदेश देण्यात आले आहे. जो प्रहार सैनिक पांठिबा जाहीर करील त्यांच्या वर पक्ष अंतर्गत कार्यवाही करण्यात येईल तसेच कोणत्याही पक्ष किंवा अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारात फिरू नये असे आवाहन प्रहार शेतकरी संघटना ता. अध्यक्ष कृष्णा पाटील, प्रहार अपंग संघटना सोयगाव ता. अध्यक्ष संदीप इंगळे, प्रहार अपंग संघटना सिल्लोड ता. अध्यक्ष शांताराम बनकर, यांनी केले आहे. यावेळी सोयगाव सिल्लोड तालुक्यातील माधवराव गवते तालुका उपाध्यक्ष, नंदा हिवाळे महिला तालुकाध्यक्ष, रेखा गव्हाणे महिला ता.उपाध्यक्ष, मगर ताई, लिलाबाई सपकाळ, असलम पठाण, विजय सरोदे, दीपक ढोरमारे, सुरेश जाधव, भागवत गव्हाणे, अंबादास मगर, तायर शहा मामु, सदीप खोसे, रमेश बावस्कर, अशोक दांडगे, सावळे काका यांच्या सह प्रहार सैनिक उपस्थित होते.
Comments