सिल्लोड तालुक्यात वाळू माफीयावर महसूल विभागाची कारवाई
- CT INDIA NEWS

- Aug 28, 2020
- 1 min read

प्रतिनिधी - गणेश चौधरी- सिल्लोड अवैध वाळू माफिया च्या विरोधात महसूल विभागाची कारवाई
औरंगाबाद
अवैध वाळू माफिया च्या विरोधात महसूल विभागाची कारवाई..
सिल्लोड तालुक्यातील अवैध वाळू माफिया यांचे विरुद्ध कारवाई करिता महसूल विभागाने पथक निर्माण केले आहे. सदरील पथक मा. उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील व तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पथक उंडणगाव शिवारात गस्त घालत असताना सायंकाळ दरम्यान . कैलास लक्ष्मण पाडवे रा.उंडणगाव यांचे ट्रॅक्टर क्र एम एच 20 सी आर 6290 मध्ये मुरूम वाहतूक करतांना आढळून आले असता सदरील वाहनांमध्ये 1 ब्रास मुरूम आढळून आला आहे. संबंधिता कडे कोणताही परवाना नसल्याने ट्रकटर जप्त करण्यात आले आहे.सदरील वाहन जप्त करून तहसील कार्यालय सिल्लोड येथे जमा करण्यात आले आहे . संबंधीत यांचेविरुद्ध एक ब्रास साठी रक्कम रु 106400 /- रुपये ( अक्षरी- एक लाख सहा हजार चारशे रु मात्र) ची दंडात्मक कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे. सदर कार्यवाही पथक प्रमुख . एस डी सोनवणे नायब तहसीलदार , ससाणे मंडळ अधिकारी, निर्वाण व इतर यांनी सदर कार्यवाही पूर्ण केली . तसेच येणा-या काळात सुद्धा अवैध गौणखनिज वाहतूक करणा-या विरुद्ध अचानक धाडी टाकून अवैध गौणखनिज वाहतूक करणा-यांची वाहने जप्त करून दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे रामेश्वर गोरे तहसीलदार व ब्रिजेश पाटील उपविभागीय अधिकारी यांनी इशारा दिला आहे.







Comments