top of page

सावंगी मध्ये मुस्लिम कब्रस्तान मध्ये सापडले महादेवाची पिंड

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Jun 29, 2020
  • 2 min read




www.ctindiatv.com


वार्ताहार -गणेश चौधरी----

हर्सूल- सावंगी ता जि औरंगाबाद येथे खाम नदीच्या तिराला श्री कैलाश धोंडिबा भालेराव हा एक मातंग समाजातील मुलगा बकरया चारीत होता त्याच्या नजरेत चमकदार असा दगड दिसला त्याला वाटलें इथे काही तरी आहे तो तिथं गेला आणि हाताने साफ करू लागला तो जसं जसा हताने साफ करू लागला तर चमत्कार भव्य अशी महादेवाची पिंड दिसली तो घाबरून बकरया घेऊन घरी आला आणि मातंग वाड्यात सांगु लागला त्याने सर्व प्रथम समाज कार्यकर्ता जनार्दन भालेराव यांना सांगितले व नंतर दामोधर भालेराव माजी सरपंच मला फोन केला आम्ही बघितल्यावर मी आमच्या गावचे पोलिस पाटील दादासाहेब जगदाळे पा आर आर आबा पाटील उपसरपंच शेक कदिर भाई यांना फोनवर माहिती दिली तर यांनी कोणताही विलंब न करता हजर झाले असे करता करता पुर्ण सावंगी वाशियांना पर्यंत बातमी पोहचली सर्व समाजातील लोकांनी महादेवाची पिंड बघीली व दर्शन घेतलेगणेश चौधरी -मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांचा स्वयंपाकी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नीता पाडळकर यांनी दिली. आयुक्तांचा स्वयंपाकिच पॉझिटिव्ह निघाल्याने मनपात खळबळ उडाली. आयुक्त होम क्वारान्टीन झाल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. शहरात कोरोनाचा  उद्रेक मोठ्या प्रमाणावर होत आहे. दररोज शंभराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आज मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्या स्वयंपाक्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे मनपात एकच खळबळ उडाली. आरोग्य यंत्रणेच्या सल्ल्याने आयुक्तांना तातडीने होम क्वारान्टीन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

*नेत्यांकडून चिंता ; विभागीय आयुक्तांची उद्या घेणार भेट* दरम्यान शहरात कोणाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वपक्षीय खासदार, आमदारांनी आज चिंता व्यक्त केली. सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत संसर्गाची स्थिती आटोक्यात येत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जाते. उद्या सकाळी ११ वाजता खासदार डॉक्टर भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार अतुल सावे, आमदार अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेणार आहेत

Www.ctindiatv.com

Ct india news


Comments


bottom of page