top of page

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी व्यवसायकर अधिकारी ने केला गुन्हा दाखल*

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 2, 2021
  • 1 min read

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी व्यवसायकर अधिकारी ने केला गुन्हा दाखल*

रिपोर्टर- महेश सूर्यवंशी

मो. 9373399115

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की ,

सरकारी कामात अडथळा आणल्या बद्दल माधवनगर संजय इंडस्ट्रीज मधील उद्योजक निरजकुमार सुभाषचंद्र गुप्ता (व्यंकटेश टेक्स्टाईल व संजय इंडस्ट्रीज माधवनगर) याच्यावर कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

व्यवसायकर अधिकारी शैलेंद्र जगन्नाथ पेंडे व जीएसटी निरीक्षक शिवराज नथुराम भोईटे हे माधवनगर औद्योगिक वसाहत मधील व्यंकटेश टेक्स्टाईल व संजय इंडस्ट्रीज येथे कर निरीक्षनासाठी गेले असता कंपनी मालक निरजकुमार सुभाषचंद्र गुप्ता यांनी अधिकाऱ्यांच्या हातातील फाईल जबरदस्तीने हिसकावून घेऊन सर्व साधारण व्यक्ती सारखी वागणूक देऊन अधिकाऱ्यांना हाकलून दिले व कर निर्धारनेची महत्वाची कागदपत्रे फाडून फेकून दिली म्हणून निरजकुमार गुप्ता यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून शैलेंद्र जगन्नाथ पेंडे (वय-४१) व्यवसायकर अधिकारी यांनी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निरज उबाळे हे करीत आहेत.


CITY INDIA NEWS

सांगली जिल्हा & बेळगाव जिल्हा प्रमुख

श्री अनिल लोहार

मो. 8999382747

Comments


bottom of page