हा इसम कुठे आढळून आल्यास आम्हाला कॉल करा...8805688265 निलेश चौधरी
- CT INDIA NEWS

- Mar 9, 2020
- 1 min read

वार्ताहार-संतोष महाले -मुक्ताईनगर-सावधान सावधान सावधान
सदर इसमाचा नाव *विशाल गणेशभाई चौधरी* असून हा व्यक्ती मुक्ताईनगर येथील श्री निलेश अरुण चौधरी यांच्या कडून १लाख ५३ हजार एवढी रक्कम आठ दिवसा साठी उसनवार म्हणून मागितली . विशाल गणेश चौधरी हा पत्नीचा मावस भाऊ असल्यामुळे श्री निलेश चौधरी यांनी त्याला ८ दिवसा साठी रक्कम दिली व नंतर जेव्हा पैसे परत मागण्याची वेळ आली ठेवा विशाल चौधरी या इसमाने पैसे देण्यास विविध प्रकारचे कारणे दाखवून टाळाटाळ केली . जेव्हा निलेश चौधरी पैसे साठी त्यांच्या राहत्या घरी नशिराबाद जिल्हा जळगाव येथे गेले तेव्हा असे समजले की विशाल गणेश चौधरी हा व्यक्ती लोकांचे पैसे लुबाडून घरून फरार झाला आहे
विशाल गणेशभाई चौधरी हा मूळ चा ओझर तालुका जामनेर जिल्हा जळगाव येथील रहिवासी आहे . परिवारा सोबत म्हणजे आई,वडील,दोन भाऊ,पत्नी व मुला सोबत तो पूर्वी सुरत येथे राहत होता , परंतु सुरत ला असताना सुद्धा विशाल गणेश चौधरी या फसव्या व्यक्ती ने अनेकांना पैसे घेऊन लुबाडले होते व सुरत वरून पळून तो नशिराबाद जिल्हा जळगाव येथे म्हणजे आपल्या सासुरवाडी ला राहत होता व गोदावरी हॉस्पिटलमध्ये कामाला होता व निलेश चौधरी व बऱ्याच व्यक्ती चे पैसे ८ दिवसात परत देतो म्हणून नशिराबाद येतुन २४ फेब्रुवारी पासून फरार झाला आहे ,
त्याच्या पाच्यात त्याची
1) वडील नामे गणेश चौधरी(ओझर)सुरत
२) आई
3) भाऊ राहुल (सोनी) चौधरी, दिनेश चौधरी
4) पत्नी नम्रता चौधरी (नशिराबाद)
5) मुलगा अंश चौधरी असा परिवार आहे
लोकांना पैसे उधार मागणे व पैसे घेऊन फरार होणे हा त्याचा पेशा आहे असे एकंदरीत त्याच्या घरच्यांना च्या बोलण्यावरून समजते .
पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या नावाची लुबाडणुकी ची केस नोंदवली असून पोलीस त्याच्या तपासावर आहे.
सदर व्यक्ति ची माहिती दिल्यास त्यांना योग्य ते बक्षीस दिले जाईल 8805688265 निलेश चौधरी मुक्ताईनगर







Comments