top of page

*हिंगणगाव ता क महांकाळ येथे उद्या शूटिंग बॉलच्या स्पर्धा*

  • Writer: CT India News
    CT India News
  • Jan 2, 2021
  • 1 min read

रिपोर्टर :- श्री सुरेश सुतार

अग्रण धुळगाव

9665635435


हेडिंग :- *हिंगणगाव ता क महांकाळ येथे उद्या शूटिंग बॉलच्या स्पर्धा*


कवठेमहांकाळ तालुक्यात शुटींग बॉल या खेळाला विशेष महत्त्व देणाऱ्या हिंगणगाव येथे जय विजय शुटिंगबॉल क्लब यांचे वतीने शुटींग बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सदरच्या स्पर्धा या फक्त सांगली सातारा व कोल्हापूर या जिल्ह्यासाठी मर्यादित आहेत स्पर्धेसाठी अनुक्रमे रुपये 4001, 3001, 2001,1501 व 1001 रुपयांची तीन बक्षिसे अशी एकूण 8 बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.


सदरच्या स्पर्धा या सकाळी 11 वाजता सुरू होतील व रात्री दहा पूर्वी कटाक्षाने संपविण्यासाठी सामना व्यवस्थापन समितीचा प्रयत्न असेल त्यामुळे संघांनी वेळेवर हजर राहून सहकार्य करण्याचे आवाहन जय-विजय मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे


सदर स्पर्धा पीव्हीपी कॉलेज कवठेमहांकाळचे निवृत्त क्रीडा शिक्षक श्री बी एन पवार सर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर राष्ट्रीय खेळाडू प्रभाकर सपकाळ सर नितीन पाटील अनिल कुमार पाटील व वसंत शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहेत


शुटींग बॉल खेळाचे संवर्धन व प्रचार करण्यासाठी जय विजय शुटींग बॉल क्लब करीत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक सरपंच शामराव इरळे व ग्रामपंचायत टिम यांनी केले असून बाहेर गावाहून येणार्‍या सर्व संघांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत हिंगणगाव उत्सुक असल्याचे ते म्हणाले



श्री अनिल लोहार सर

CT INDIA NEWS सांगली जिल्हा

व बेळगाव जिल्हा प्रमुख

8999382747

Comments


bottom of page