top of page

हेडिंग - अहमदनगर :  जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याच समोर आलं आहे.यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा

  • Writer: CT India News
    CT India News
  • Dec 1, 2020
  • 1 min read

प्रतिनिधी- संतोष खामकर - अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याच समोर आलं आहे.यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या करण्यात आली आहे.

पुणे येथे जरे या सोमवारी कामानिमित्त गेल्या होत्या. यानंतर त्या पुण्यातून कारने नगरकडे येत होत्या. यावेळी जातेगाव फाट्याजवळ मोटरसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांना अडविले. यावेळी एकाने जरे यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. हल्ल्यात गंभीरित्या जखमी झाल्या.

यानंतर जरे यांना काही वेळातच नगरच्या जिल्हा रुग्णालयात दखल केले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.......

ही सर्व घटना नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाट्याजवळ (ता.पारनेर) सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली तसेच आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे त्यांनी सांगितले

Comments


bottom of page