top of page

हेडिंग - उपेक्षित कलावंताचे लोकवर्गणीतून केली शस्त्रक्रिया

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 6, 2020
  • 2 min read

*उपेक्षित कलावंताचे लोकवर्गणीतून केली शस्त्रक्रिया*


पाचोरा :- श्री योगेश चौधरी - (जळगाव प्रतिनिधी) वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परीषद महाराष्ट्र राज्य चे बापू यादव पाटील रहाणार सारोळा ता. पाचोरा हे मागील चाळीस वर्षे लोककलेच्या माध्यमातून विविध कलापथक, भजन, भारूड, तमाशा फडा मध्ये उत्कृष्ट हार्मोनियम वादन तसेच गायन, व विनोदी कलाकार म्हणून महाराष्ट्र भर फिरून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु त्याना मूलबाळ व पत्नी म्हणून त्यांच्या मागे कुणाचेही पाठबळ नाही. आता वयाच्या पन्नाशी झाली. अशातच दोघी डोळ्यांनी स्पष्ट दिसत नसल्याने त्यांचे खुप हाल होत आहेत. अशा परिस्थितीत ते शाहीर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन( माऊली ) जिल्हा सरचिटणीस वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परीषद महाराष्ट्र राज्य यांना जावून भेटले. शाहीर विठ्ठल महाजन यांनी या कलावंताची संपूर्ण परिस्थिती एकुण घेतली आणि २ नोव्हेंबर रोजी आमदार मा. श्री किशोरअप्पा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना कार्यालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर मध्ये जाऊन तपासणी केली. परंतु मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पैशांची गरज भासत होती. म्हणून शाहीर विठ्ठल महाजन यांनी स्वता: लोकांना भेटून मदतीची मागणी केली. व दानशूर लोकांनी तेवढीच सढळ हाताने मदत केली. आणि शेवटी कांताई नेत्रालय जळगाव येथे ३ नोव्हंबर रोजी शस्त्रक्रिया झाली व गरजु कलावंत रूग्णला मदत व आधार मिळाल्याने समाधान झाले.

शासनाने अशा उपेक्षित कलावंतांना ज्यानी आयुष्यभर कलेच्या माध्यमातून मनोरंजन व प्रबोधन केले.त्यांच्या कडे दुर्लक्ष न करता त्यांच्या परिवाराचे उदरनिर्वाह व आरोग्य साठी मानधन देवून काही तरी उपाययोजना करावी. शाहीर श्री.विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) जळगाव जिल्हा सरचिटणीस वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परीषदेच्या माध्यमातून अपेक्षा व्यक्त केली व लवकरच या मागणीकडे शासनाने लक्ष केंद्रित करावे या मागणीसाठी जिल्हाभरात जिल्हाधिकारी,प्रांत, तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात येईल. असे जाहीर केले.

यावेळी ३ नोव्हेंबर रोजी सांयकाळी सावता महाराज टी स्टाॅल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रुग्णाला फळे, तुप खाद्य पदार्थ देताना शाहीर विठ्ठल महाजन व नाना वाघ उपस्थित होते .

Comments


bottom of page