हेडिंग- कुपवाड मध्ये सख्या भावाने भावाचा केला निर्घृण खून
- CT India News
- Jan 25, 2021
- 1 min read
हेडिंग- कुपवाड मध्ये सख्या भावाने भावाचा केला निर्घृण खून
रिपोर्टर - महेश सूर्यवंशी ,माधवनगर
मो. 9373399115
कुपवाड परिसरातील सराईत गुन्हेगार सन्या उर्फ शुभम पारसलाल जैन वय वर्ष 23 राहणार कुपवाड खारे मळा, या सराईत गुन्हेगाराचा त्याच्याच लहान सख्या भावाने धार धार शास्त्र व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सन्या उर्फ शुभम पारसलाल जैन याच्यावरती अनेक प्रकारचे 10 पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून तो अनेक ठिकाणी मारामाऱ्या खंडणी तसेच चोरी अशा अनेक प्रकारचे गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत. हा तरुण अनेक गुन्हेगारी कृत्यात सहभागी होता. शनिवारी रात्री देखील सन्या उर्फ शुभम याची त्याचा सख्खा लहान भाऊ शशांक पारसलाल जैन वय वर्षे 20 राहणार खारे मळा कुपवाड याच्याशी काही घरगुती कारणास्तव जोरात वाद निर्माण झाला.हा वाद अत्यंत जोरात उफाळून आल्याने त्याचा भाऊ सन्या उर्फ शुभम त्यानें घरातील कोयता बाहेर काडून भाऊ शशांक पारसलाल जैन वर हल्ला करताच त्याने तिथून पळ काढला. व सन्या उर्फ शुभम त्याचा पाठलाग करत राणाप्रताप चौकांमध्ये आला असता त्याला टेस लागून सन्या उर्फ शुभम खाली कोसळला व त्याच्या भावाने जमिनीवर पडलेला दगड त्याच्या डोक्यात घातला असता त्याचा रक्ताच्या थारोळ्यात जागीच मृत्यू झाला. अशी माहिती घटनास्थळावरून समोर येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलिस सहायक निरीक्षक नीरज उबाळे यांच्या टीम ने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व शशांक उर्फ चीट्या पारसलाल जैन याला काही वेळातच अटक करण्यात आली. गुण्यात वापरण्यात आलेले सशस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा पुढील तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक नीरज उबाळे करत आहेत. मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे त्या ठिकाणी उपस्थित होते









Comments