हेडिंग - घाटनाद्रेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
- CT India News
- Oct 23, 2020
- 1 min read
*घाटनांद्रेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या*
घाटनांद्रे/वार्ताहर:- घाटनांद्रे (ता कवठेमहंकाळ) येथील लालासो बापू मुलाणी (वय वर्षे ५२) यांनी राहात्या घरा शेजारी आसणारया लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना काल बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.सदर घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की घाटनांद्रे गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आडगिरे मळा वस्ती आहे.येथे लालासो मुलाणी आपल्या कुटूंबासह रहात होते. मुलाणी यांनी आपल्या राहत्या घराशेजारी आसणार्या लिबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.ही बाब सकाळी साडे नऊ वाजण्याचे सुमारास निदर्शनास आली.
आत्महत्येचे कारण माञ समजू शकले नाही.सदर घटनेची कवठेमहांकाळ पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करीत आहेत.
(सोबत फोटो पाठवत आहे)









Comments