top of page

हेडींग :- तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या ३३/११ केव्ही ५ एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्राची वाढ करून आत्ता

  • Writer: CT India News
    CT India News
  • Sep 6, 2021
  • 1 min read

हेडींग :- तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या ३३/११ केव्ही ५ एमव्हीए क्षमतेच्या उपकेंद्राची वाढ करून आत्ता नविन १० एमव्हीए क्षमतेने वाढ केली.

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले,

"अखंडीत वीज पुरवठा होण्यास होणार मदत"

प्रतिनिधी:- श्री आबासाहेब महामुनी पालघर जिल्हा हेड,

8530339777

बोईसर : ०४ सप्टेंबर २०२१ पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर औद्योगिक वसाहतीतील पुर्वीच्या ५ एमव्हीए क्षमतेच्या केद्राची वाढ करून आत्ता नविन १०एमव्हीए ने

क्षमतावाढ केलेले वीज वितरण उपकेंद्र चे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. या उपकेंद्रांमुळे औद्योगिक वसाहतीला अखंडित वीजपुरवठा होण्यास मोलाची मदत मिळणार आहे.

औद्योगिक वसाहतीतील क्रमांक पाच हे ३३/११ केव्ही उपकेंद्र पाच एमव्हीए क्षमतेचे होते. कॅपेक्स योजनेतून या उपकेंद्राची क्षमता १० एमव्हीए करण्यात आली आहे. परिणामी या उपकेंद्रांतर्गत औद्योगिक व इतर ग्राहकांना शाश्वत व अखंडित वीजपुरवठा मिळण्यात मोठी मदत होणार आहे. मुख्य अभियंता औंढेकर यांच्या हस्ते क्षमतावृद्धी केलेल्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालघर मंडलाच्या अभियंता किरण नागावकर,मॅडम,

कार्यकारी अभियंते प्रताप मचिये, युवराज जरग, उपकार्यकारी अभियंते लक्ष्मण राठोड, सुरेश सुराडकर आदी उपस्थित होते. त्यानंतर मुख्य अभियंता औंढेकर यांनी औद्योगिक वसाहतीतील आयएसओ मानांकित ३३/११ केव्ही वितरण उपकेंद्राची पाहणी केली. तारापूर इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशनच्या (टिमा) पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मुख्य अभियंता औंढेकर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याबाबत त्यांना आश्वासित केले. तौक्ते चक्री वादळात अविरत परिश्रम करून औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा त्वरित सुरळीत केल्याबद्दल असोशिएशनच्या सदस्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे यावेळी कौतुक केले व वीज पुरवठ्याबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी असोशिएशनचे पदाधिकारी डी. के. राऊत, एस. आर. गुप्ता, पापा ठाकूर, संदीप सावे, नीरज पुरोहित आदी उपस्थित होते.

CT INDIA NEWS

कार्यकारी संपादक

श्री तुकाराम सुतार सर,

9604007344

Comments


bottom of page