top of page

हेडिंग - पैठणमध्ये अघोरी कृत्य ! मंदिरात आढळला युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृत्यदेह

  • Writer: CT India News
    CT India News
  • Dec 11, 2020
  • 1 min read

पैठण : शहरातील गंगेश्वर महादेव मंदिरात कहारवाडा येथील रहिवाशी असलेल्या २५ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरलेला मृृृतदेह गुरुवारी सायंकाळी आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तरूणाचा मृतदेह महादेवाच्या पिंडीलगत असल्याने पिंड रक्ताने माखून निघालेली होती. यामुळे हे अघोरी कृत्य अंधश्रद्धेतून झाले असावे अशी चर्चा होत आहे. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवला असून परिसर सील करून तपास सुरू केला आहे.

पैठण शहरातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास सुरू असताना पुन्हा एका घटनेने आज पैठण शहर हादरले आहे.

Comments


bottom of page