*हेडींग -पणज येथील महालक्ष्मी माता यात्रा महोत्सव रद्द* पणज अकोट तालुक्यातील पणज येथील महालक्ष्मी म
- CT India News
- Sep 13, 2021
- 1 min read
*हेडींग -पणज येथील महालक्ष्मी माता यात्रा महोत्सव रद्द*
पणज अकोट तालुक्यातील पणज येथील महालक्ष्मी माता मंदिरात दरवर्षी होणारा यात्रा महोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम याहीवर्षी प्रशासनाच्या निर्देशानुसार रद्द करण्यात आला आहे महाप्रसाद समिती व गावकरी मंडळी पणज यांच्याकडून दरवर्षी ज्येष्ठा गौरी पुजनाच्या दिवशी हा यात्रा महोत्सव व महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात येतो. सलग तीन दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवा दरम्यान भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनाकरिता महाराष्ट्रातून दाखल होत होते परंतु याहीवर्षी शासनाच्या निर्देशानुसार यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला आहे याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे महाप्रसाद समिती व गावकरी मंडळी यांनी कळविले आहे CT India News प्रतिनिधी, नरेश पुनकर सावरा तर, अकोट जि, अकोला कार्यकारी संपादक -तुकाराम सुतार









Comments