top of page

हेडिंग - पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नांना बाबत ठराव घेण्यासाठी व्यापक बैठक घ्या - गणेश पवार यांची मह

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 17, 2020
  • 2 min read

पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नांना बाबत ठराव घेण्यासाठी व्यापक बैठक घ्या - गणेश पवार यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडे मागणी


औरंगाबाद,( प्रतिनिधी ) श्री उमेश आव्हाळे - कोविड 19 मुळे राज्यातील पत्रकारांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.लाँगडाऊन मुळे मागील सात ते आठ महिण्या पासून पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.अनेकांना नौकरी गमवावी लागली आहे.लोकशाहीचा चौथा स्तभं म्हणून कोरोनाशी झुंज देत आपले कर्तव्य प्रमाणीक पणे पार पाडलेले आहे.आपले कर्तव्य पार पाडतांना अनेक पत्रकार बांधव शाहीद झाले आहे.काही दैनिकांच्या मालकांना इच्छा असून ही त्यांना मदत करता आली नाही.आणि शासनानेही पत्रकारांना कुठलीच मदत केलेली दिसत नाही.त्या मुळे पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीने विचार मंथन करण्यासाठी एका व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात यावे,पत्रकारांच्या प्रश्नांचा पाठपुरवा शासना कडे करण्यासाठी ठराव घेण्यात यावा,अशी मागणी औरंगाबाद येथील पत्रकार तथा समाज सेवक गणेश पवार यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय भोकरे यांच्या कडे एका निवेदनाव्दारे केली आहे.राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त दिलेल्या निवेदनात गणेश पवार यांनी पत्रकारांना भेडसावणात्र्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतलेले आहे.सदरील निवदेनाची प्रत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष डाँ.प्रभू गोरे यांना सादर करण्यात आली आहे.या निवेदनात पवार यांनी पत्रकारांना भेडसावणात्र्या अनेक मुुद्दांचा उल्लेख केलेला आहे.सक्रीय पत्रकारांना सर्व प्रकारचे आर्थिक संरक्षण दिले जावे तसेच जेष्ठ पत्रकारांना शासनाच्या सर्व सवलती मिळवून देऊन त्यांना पेन्शन सुरू करण्यात यावी,शासकीय जाहिराती प्रकाशित झाल्या पासून एक महिन्याच्या आत मध्ये बिल मिळावे.दिवाळी विशेषांकाच्या जाहिराती उधार प्रकाशीत करण्यात येऊ नये.पत्रकार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात यावी.पत्रकारांच्या मुलांना स्वतंत्र शिष्यवूती मिळावी.आरोग्याच्या दुष्टीकोनातून प्रिंट मिडीया,डिजीटल मिडीया,सरसकट सर्व पत्रकारांचा समावेश ESI योजनेत करावा,शासनाच्या श्रमजीवी योजनेत सरसकट सर्व पत्रकारांचा समावेश करावा,आगामी काळात पत्रकार राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी प्रयत्न करावा,पत्रकारांच्या विकासासाठी दर्पणकार बाळशात्री जांभेकर स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे,कोरोना काळात आपले कर्तव्य पार पाडतांना शाहीद झालेल्या पत्रकारांच्या मुलाला किंवा पत्नीला शासकीय नौकरीत घेण्यात यावे,समाजातील विविध घटकांसाठा केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आर्थिक पँकेज जाहीर केल्या जाते.त्याच अनुषंगाने पत्रकारांसाठीही तशी तरतूद करावी.असे अनेक मुद्दे सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.या वेळी जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर,छाबूराव ताके,अनिल सावंत,मनोज पाटणी,मुकेश मुंदडा,जाँन भालेराव,रवि वैघ,खराडे पाटील,सतीश पाटील,सुचित ताजणे,यांची उपस्थिती होती.

Comments


bottom of page