top of page

हेडिंग - भाजपा च्या स्वीकृत नगरसेविका डॉ. प्राची कदम यांची पुण्यात आत्महत्या

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 29, 2020
  • 1 min read

प्रतिनिधी - सचिन चौधरी (पुणे)  मेढा (ता. जावळी) शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ व मेढा नगरपंचायतीच्या भारतीय जनता पक्षाच्या स्वीकृत नगरसेविका डॉ. प्राची रमेश कदम यांनी पुण्यात आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेढ्यातील व्यापारी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळला.

मेढा येथील कदम हॉस्पिटलच्या डॉ. प्राची रमेश कदम या एक मनमिळाऊ स्वभावाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ होत्या. अतिशय सेवाभावी वृत्तीने त्या आपला वैद्यकीय व्यवसाय करत असल्याने महिला वर्गात त्यांना मानाचे स्थान होते. कोरोना काळात त्यांनी कोरोनायोद्धा म्हणून उल्लेखनीय काम केले

गेले तीन महिने त्या पुणे येथे होत्या. शुक्रवारी रात्री त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

पुणे येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शिवसेनेच्या वतीने डॉ. कदम यांना आदरांजली म्हणून मेढा बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन शुक्रवारी रात्री केले होते. त्यानुसार आज (शनिवारी) त्याला व्यापारी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळण्यात आला. डॉ. कदम यांच्या मागे पती, दोन मुली, सासू, सासरे, दीर असा परिवार आहे .

Comments


bottom of page