हेडिंग - मराठी साहित्य मंडळाच्या सांगली जिल्हा अध्यक्ष पदी सौ अर्चना पांचाळ (सुतार ) यांची नियुक्ती
- CT India News
- Oct 28, 2020
- 2 min read

मराठी साहित्य मंडळाच्या सांगली जिल्हा अध्यक्ष पदी अर्चना पांचाळ - सुतार
*** महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष घोषित
आखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मराठी साहित्य मंडळाच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी सांगली येथील कवयित्री,लेखिका अर्चना पांचाळ सुतार यांची नुकतीच निवड करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या "मराठी साहित्य मंडळ" या प्रख्यात संस्थेने देशभरातील राज्यांच्या प्रदेश अध्यक्षांची यादी नुकतीच घोषित केली होती. त्यामुळे साहित्य वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती, ते वादळ शमते ना शमते तोच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा अध्यक्षांची यादी जाहीर केली आहे. ही यादी जाहीर करताना पुरेपूर दक्षता घेतल्याचे दिसून येत आहे,
साहित्य मंडळाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा जेष्ठ कवयित्रीं ललिता गवांदे यांच्या उपस्थितीत सरचिटणीस कवयित्रीं सोनम ठाकूर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्या आदेशानुसार नुकतीच एका पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.
राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्षाच्या नावाची घोषणा सदर बैठकीत करण्यात आली.
- ठाणे जिल्हा अध्यक्ष जेष्ठ लेखक विनोद मूळे
- ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष जेष्ठ कवी परशुराम नेहे
- पालघर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण विभाग जेष्ठ कवी मधुकर भोय
- पालघर जिल्हा अध्यक्षा शहरी विभाग जेष्ठ कवयित्रीं नीता राऊत
- नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष जेष्ठ कवी नितीन म्हात्रे
- मुंबई जिल्हा अध्यक्षा मध्य विभाग जेष्ठ कवयित्रीं मीना पगारे
- मुंबई जिल्हा अध्यक्षा पश्चिम विभाग जेष्ठ कवयित्रीं आशा ब्राह्मणे
- सातारा जिल्हा अध्यक्ष जेष्ठ लेखक विनायकराव जाधव
- कोल्हापूर जिल्हा अध्यक्षा डॉ मनीषा चौगुले
- पुणे जिल्हा अध्यक्षा लेखिका/कवयित्री हर्षदा झगडे
- हिंगोली जिल्हा अध्यक्ष लेखक कवी राजू रणवीर
- परभणी जिल्हा अध्यक्ष लेखक रघुवीर खरात
- उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक भैरवनाथ कानडे
- जळगाव जिल्हा अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक गौतमकुमार निकम
- औरंगाबाद जिल्हा अध्यक्षा प्राचार्या छाया भोसले
- नगर जिल्हा अध्यक्षा लेखिका लीना कुलदीप आढे
- रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष लेखक रवींद्र वणकुद्रे
- सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष लेखक महेश पुंडलिक कासार
- चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जेष्ठ कवी वसंत विठ्ठलराव ताकधट
- नाशिक जिल्हा अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक नवनाथ गायकर
- नांदेड जिल्हा अध्यक्ष जेष्ठ कवी माधव जाधव
- अमरावती जिल्हा अध्यक्षा कवयित्रीं रत्ना मनावरे
- जालना जिल्हा अध्यक्ष लेखक प्रमोद दिगंबर शिणगारे
- नंदुरबार जिल्हा अध्यक्षा लेखिका सुरेखा वळवी
- रायगड जिल्हा अध्यक्ष कवी दशरथ भाऊ एरणकर
- बीड जिल्हा अध्यक्ष लेखक प्रवीण जावकर
- यवतमाळ जिल्हा अध्यक्षा जेष्ठ गजलकार मिनाक्षी किलावत
- नागपूर जिल्हा अध्यक्ष सतीश इंदुगणेश कान्हेरकर
- धुळे जिल्हाअध्यक्ष लेखिका सुनंदा सोमा निकम
- बुलडाणा जिल्हा अध्यक्ष -कवी किशोर बुझाडे
- लातूर जिल्हा अध्यक्ष विद्रोही कवी आनंद चिंचोले
- सोलापूर जिल्हा अध्यक्षा डॉ सुनीता सूर्यवंशी
या यादीमध्ये जुन्या आणि नव्या साहित्यिकांची सुरेख सांगड घालण्यात आली आहे, त्यामुळे साहित्य क्षेत्रात सर्वत्र चर्चेचा विषय सुरू झाला आहे, नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्षांच्या कार्याचा झपाटा लक्षात घेता ते मराठी साहित्य क्षेत्राला संजीवनी प्राप्त करून देतील असा विश्वास अनेक साहित्यिकांना वाटतो.
मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी ज्या कोणाला मराठी साहित्य चळवळीमध्ये सहभागी व्हायचे असेल अशा सर्व लेखक कवी मंडळींनी आपापल्या जिल्ह्यामधील जिल्हा अध्यक्षाशी त्वरित संपर्क साधावा.
मराठी भाषेला पुन्हा नव्याने झळाळी प्राप्त करून देण्यास सहकार्य करावे, असे नम्र आवाहन राष्ट्रीय सरचिटणीस कवयित्रीं सोनम ठाकूर यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, तरी इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळा तर्फे करण्यात आले आहे.









Comments