top of page

हेडींग:- रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 4, 2021
  • 1 min read

हेडींग:- रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतसंघचालकपदी नानासाहेब जाधव यांची निवड

रिपोर्टर: बाळासाहेब वाघमोडे 9175644543

पुणे : रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रांतसंघचालक म्हणून सुरेश तथा नानासाहेब जाधव यांची पुढील तीन वर्षांसाठी निवड झाली आहे.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी ही निवड घोषित केली.

दर तीन वर्षांनी संघाच्या जिल्ह्यापासून वरील सर्व स्तरावरील संघचालकपदे व अखिल भारतीय सरकार्यवाह यांच्या निवडणुका होत असतात. त्याशिवाय अखिल भारतीय प्रतिनिधींचीदेखील निवड होत असते. कोरोना संकटाने ऑनलाईन घेण्यात आलेल्या या बैठकीत नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर या जिल्ह्यातील निर्वाचित संघशाखा प्रतिनिधींनी ही निवड केली.

नानासाहेब जाधव हे मूळ बेलापूर (श्रीरामपूर) येथील रहिवासी असून सध्या नगर येथे स्थायिक आहेत. त्यांनी कृषी अभियांत्रिकीमधील एम.टेक. पदवी प्राप्त केलेली असून माती आणि पाणी संवर्धनातला त्यांचा विशेष अभ्यास आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ते १९८३ ते २०१२ या काळात प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. पदवी प्राप्त केल्यावर संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मावळ, शिरूर तालुका तसेच जळगाव जिल्हा स्तरावर सहा वर्ष काम केले. यापूर्वी रा. स्व. संघाच्या जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावर त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळलेल्या असून २०१३ पासून प्रांतसंघचालक पदावर ते कार्यरत आहेत.

त्यांच्या निवडीनंतर प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी त्यांचे अभिनंदन करताना प्रांतातील संघकामासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा पुढील काळात

पुनश्च लाभ मिळणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या बैठकीत प्रांतातील सर्व जिल्हा, विभाग व प्रांत स्तरावरील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments


bottom of page