हेडिंग - विषारी औषध प्राशन करून वैरागड येथील युवकाची आत्महत्या
- CT India News
- Oct 30, 2020
- 1 min read
CT INDIA NEWS लासूर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा
विषारी औषध प्राशन करुन युवकाची आत्महत्या केल्याची घटना घडली..
गंगापुर तालुक्यातील: लासूर स्टेशन परीसरातील वैरागड येथील युवकांने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली राजु वाघचौरे यास उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय हॉस्पिटल मध्ये घेवुन गेले असता उपचारा दरम्यान त्यांच मुत्यु झाला, आत्महत्याचे कारण समजु शकले नाही
मात्र दिनांक 28 आॅक्टोबर रोजी रात्री आकरा वाजेच्या सुमारास मौजे वैरागड ता.गंगापूर येथील राजू भाऊसाहेब वाघचौरे, वय 26 वर्षे, रा.वैरागड याने काहीतरी विषारी औषध प्राशन केले राजु यास उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकिय हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचारा दरम्यान सकाळी आठ वाजेसुमारास मुत्यु झाला त्याच्या निधनाने कुटूंबावर शोककळा पसरली सदर मुलगा हा अविवाहित होता.
सदर प्रकरणावरून पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कैलास राठोड, आनंद आरसुडे हे करीत आहे









Comments