top of page

हेडींग- शिलेगाव मध्ये 4 दरोडेखोरांना अटक

  • Writer: CT India News
    CT India News
  • Mar 14, 2021
  • 1 min read

CT INDIA NEWS लासुर स्टेशन प्रतिनिधी मनिष मुथा

गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लासुर स्टेशन येथे साईशंकर पेट्रोल पंपासमोर रात्री दीड वाजेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेले काही इसम हे संशयितरित्या अंधारात लपले असल्याचे शिल्लेगाव पोलिसांना ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील गस्ती दरम्यान दिसून आले असता पोलिसांना पाहताच दरोडेखोर जवळ असलेल्या स्कॉर्पियो गाडीमध्ये पळून जात असताना त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून मोठया शिताफीने दोन दरोडेखोर पकडले असुन चार जण पोलिसांच्या तावडीतून निसटुन पळाले त्यामुळे शिल्लेगाव पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन केले असून पेट्रोल पंपासमोर अंधारात लपुन बसलेल्या दरोड्याच्या तयारीत असलेल्या व दरोडेखोराजवळ असलेल्या स्कार्पिओ गाडीत लोखंडी रॉड, गज, लाकडी काठ्या, लोखंडी तलवार ,हत्यारे दरोड्यासाठी वापरण्यात आलेली स्कार्पिओ गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगार१)प्रमोद शिरसाट २)जितू गायकवाड दोघे राहणार डोमेगाव ता.गं ४)रवी भोसले ५) शक्तुर भोसले ६) सोनू सर्व राहणार गाजगाव ता.गंगापूर अशी दरोडेखोरांची नावे असुन त्यांच्याविरुद्ध शिल्लेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

दरम्यान सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल ढाकणे,हेडकॉन्स्टेबल पवार,पोलिस कॉन्स्टेबल नारायण दुलत,अनिल दाभाडे,संतोष गिरी,यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर हे करीत आहेत

Comments


bottom of page