top of page

*हेडिंग - शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) पाचोरा यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती .*

  • Writer: CT India News
    CT India News
  • Nov 2, 2020
  • 1 min read

ree

*शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली) पाचोरा यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती .*


पाचोराः वाघ्या मुरळी कलावंत शाहीर परिषद महाराष्ट्र राज्याचा मेळावा चाळीसगाव, भडगाव, पाचोरा,एरंडोलचे कलावंताचा भडगाव येथे कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात शाहीर श्री विठ्ठल एकनाथ महाजन (माऊली )पाचोरा यांची जळगाव जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली तसेच पाचोरा तालुका अध्यक्ष पदी (गौरव) उर्फ समाधान अशोक गोसावी ओझर ता.पाचोरा यांची सर्वानुमते संस्थेचे मुख्य संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे सर पुणे, श्री. महेंद्रजी गुरव साहेब उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, श्री. महेंद्र अहिरे साहेब, उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, श्री प्रकाश वाघ साहेब जळगाव जिल्हा अध्यक्ष यांनी ही नियुक्ती केली. कलावंताच्या न्याय, हक्क व संघटन करण्यासाठी ही परिषद कार्य करीत आहे.

यावेळी जिल्हा सल्लागार शाहीर निंबा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सरदार,भडगाव तालुका अध्यक्ष संतोष मोरे ,तालुका उपाध्यक्ष विजय सूर्यवंशी , तालुका प्रसिद्ध प्रमुख भाऊसाहेब सूर्यवंशी,परशुराम सुर्यवंशी अनिल महाजन, फुलसिंग नाईक, पाचोरा तालुका उपाध्यक्ष पप्पू सोनवणे, शिवाजी ठाकुर ,तालुका सचिव नथ्थु अप्पा पाटील,तालुका उपसचिव बापु यादव पाटील, पाचोरा शहर अध्यक्ष युसूफ खाटीक इत्यादी कलावंत शाहीर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने नियुक्ती साठी उपस्थित होते. शाहीर विठ्ठल महाजन (माऊली) हे सामाजिक कार्यकर्ते म्हणुन नेहमी अग्रेसर आहेत. या निवडीचे जिल्हातुन कलावंत व बहुजन समाज व मान्यवर मंडळी अभिनंदन करत आहेत.

Comments


bottom of page