हेडिंग -*सागरेश्वर परिसरातील बिबट्या नरभक्षक होण्यापूर्वी बंदोबस्त करा*अन्यथा वंचित आघाडीकडून जनआंदो
- CT India News
- Dec 28, 2020
- 1 min read
प्रतिनिधी - पूजा कांबळे - विटा - 9930707232
*सागरेश्वर परिसरातील बिबट्या नरभक्षक होण्यापूर्वी बंदोबस्त करा*
*अन्यथा वंचित आघाडीकडून जनआंदोलनाचा इशारा*
मागील काही दिवसांपूर्वी यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य परिसरात बिबट्या प्राण्याचे दर्शन झाले होते, बिबट्यापासून मानवी जीवनास तसेच पाळीव प्राण्यांच्या जीवितास धोका आहे त्यामुळे तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन *वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते राजेश गायगवाळे यांच्यासह शिष्टमंडळाने वनक्षेत्रपाल प्रादेशिक वनविभाग कडेगाव व तहसीलदार कडेगाव* यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि बिबट्याच्या दर्शनाने परिसरातील वातावरण भीतीचे झाले असून ज्या परिसरात बिबट्या आहे त्या परिसरातून ताकारी देवराष्ट्रे हा वर्दळीचा मार्ग आहे तसेच या परिसरात शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना जावे लागत असते तसेच कडेगाव पलूस आणि वाळवा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांच्या शेतामध्ये वस्त्या आहेत त्याचप्रमाणे या भागात शेळ्या व मेंढ्याना चारण्यासाठी अनेक मेंढपाळ, गुराखी डोंगर परिसराच्या अवतीभवती वावरत असतात या सर्व लोकांमध्ये बिबट्याची प्रचंड भीती निर्माण झाली असून मागील आठवड्यात दोन विविध घटनांमध्ये दोन युवकांवर बिबट्याने हल्ला करणेचा प्रयत्न केला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
त्यातच बीड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यामध्ये बिबट्याने थैमान घातलेली घटना ताजी असलेने सागरेश्वर परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. तेथील बिबट्याप्रमाणे हा बिबट्या भक्षक होऊन दुर्दैवाने काही घटना घडलेस याची सर्वस्वी जबाबदारी हि वनविभागाची राहिल असेही निवेदनात म्हटले आहे.
दुर्दैवाने हल्ल्याची घटना घडू नये यासाठी प्राणी कायद्यातील नियम व अटींचे पालन करत तातडीने या बिबट्याला पकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे अन्यथा या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देणेत आला होता, यावेळी *वंचित बहुजन आघाडीचे डॉ. राजेश साठे, मुरलीधर बनसोड*े हे हि उपस्थित होते.









Comments