हेरले गावामध्ये एक गाव एक गणपती बसवण्यासाठी सर्व मंडळाची एक आढावा बैठक
- CT INDIA NEWS

- Aug 11, 2020
- 1 min read

प्रतिनिधी- धंनजय सुतार सांगली - हेरले वार्ता,
हेरले गावामध्ये एक गाव एक गणपती बसवण्यासाठी सर्व मंडळांची एक आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन पी आय माननीय प्रणिल गिल्डा, उपसरपंच राहुल शेटे पोलीस पाटील माननिय नयन पाटील, माजी उपसरपंच विजय भोसले, संदीप चौगुले, मुनीर जमादार ग्रामपंचायत सदस्य शरद आलमान, कोळेकर सर व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
. यामध्ये प्रामुख्याने सर्व मंडळ यांच्याकडून ठरवण्यात आले की,
*समाज प्रबोधन व सामाजिक उपक्रम म्हणजेच गणेश उत्सव हीच खरी आपली "श्रद्धा"*
म्हणून आपण कोरोनाच्या संकट काळात या खालील सामाजिक कार्यासाठी तयार होऊया व आपल्या गावाची शान वाढवूया
*सर्व मंडळाच्या वतीने शिद्धोबा डोंगर येथे दोन दिवस वृक्षारोपण करणे*
*सर्व मंडळाच्या वतीने* *covid-19* *म्हणून गावांमध्ये दोन दिवस महारक्तदान शिबीर घेणे*
*प्रत्येक मंडळाच्या वतीने आपली गल्ली व परिसर दोन दिवस स्वच्छता अभियान राबवणे*
असे असे अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प मंडळाच्या प्रत्येक पदाधिकारीनी घेतला.







Comments