top of page

१ जानेवारीला चाळीसगांवात होणार विश्वविक्रम आपणही सहभागी होऊ शकता.

  • Writer: CT INDIA NEWS
    CT INDIA NEWS
  • Dec 19, 2019
  • 1 min read

ree

क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन अंतर्गत नीती आयोग भारत सरकार व शिक्षण विभाग पंचायत समिती चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगांवात विश्वविक्रम होणार आहे. LARGEST ENVIRONMENT PROTECTION AWERNESS RALLY या नावाने दिनांक 1 जानेवारी 2020 रोजी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.सदर रॅलीत चाळीसगाव तालुक्यातील २५००० विद्यार्थी सहभाग घेणार आहेत तसेच २५००० विध्यार्थीना झाडे दत्तक देणार आहेत.तीन वर्षे जे विध्यार्थी झाडांचे संगोपन करेल त्यास शिष्यवृत्ती व अनेक फायदे मिळणार आहेत.तसेच ह्या झाडांवर अँप द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थाला वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे पण त्यास अँपवर रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व सामान्य जनता १ झाड दत्तक घेऊन ह्या विश्वविक्रमात सहभागी होऊ शकते. आपण आपल्या परिवारातील सदस्य, मित्र ,पालक व विद्यार्थी तसेच पर्यावरण मित्र व समाजसेवक आणि समाजसेवी संस्था यांनी सहभाग नोंदवा ही विनंती. या वर्ल्ड रेकॉर्ड साठी जगातून व देशातून सुज्ञ नागरिक व पर्यावरण मित्र सहभागी होणार आहे. आपण रॅली ला आलेच पाहिजे असे नाही. फक्त खालील लिंक वर जाऊन आपण व आपल्या विद्यार्थ्यांचे किंवा आपले रजिस्ट्रेशन केले तरी आपल्या सहभागाची नोंद आमच्या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होणार आहे व सर्व सहभागी नागरिकांना वर्ल्ड रेकॉर्ड चे प्रमाणपत्र मिळणार आहेत. आपल्या जिल्हातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने या मध्ये सहभागी होऊन प्रदूषणाच्या विरुद्ध लढा द्यावा व सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये अँप डाऊनलोड करून सहभाग नोंदवा व आपण जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या जळगाव जिल्ह्याचे नाव संपूर्ण जगातच्या पाठीवर पोहचवावे पोहचावे असे अव्हान श्री अश्विन खैरनार जिल्हाअध्यक्ष जळगांव क्राईम अँड करपशन कंट्रोल असोसिएशन व श्री विलास भोई प्र गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चाळीसगाव. यांनी सर्व सामान्य जनतेला केले आहे.

*Link:- https://play.google.com/store/apps/details?id=com.nicelyapp.app


*Play Store :- nicely app

Comments


bottom of page