top of page

२० शेळ्या व २ बोकड शेळी गट वाटप योजनेसाठी पशुपालकांन

  • Writer: CT India News
    CT India News
  • Dec 4, 2021
  • 1 min read

प्रतिनिधी : कृष्णात मोरे,जावली सातारा


हेडींग : २० शेळ्या व २ बोकड शेळी गट वाटप योजनेसाठी पशुपालकांनी अर्ज करण्याचे आवाहन


राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सन 2021-22 या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये “20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे” या योजनेसाठी निधी उपलब्ध झाला असुन पशुपालकांनी योजनेचे परिपुर्ण अर्ज दि. 1 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीतच पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) संबंधित पंचायत समिती यांच्याकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार व पंचायत समिती जावली पशुधन विकास अधिकारी डॉ प्रफुल घोडके यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत शेळ्यांचा वाडा बांधकामासाठी व मोकळी जागा मिळून किमान 2000 चौ. फुट स्वत:ची जमीन, जागा लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे. एका शेळी गटाची किंमत रुपये 2 लाख 31 हजार 400 इतकी असून सर्व प्रवर्गांसाठी 50 टक्के अनुदान रुपये 1 लाख 15 हजार 700 देय असणार आहे.

गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बॅंक खात्यात अनुदान जमा करण्यात येणार आहे.

योजनेच्या अर्जसोबत सादर करावयाची कागदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार ) संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहण करण्यात आले आहे.

CT INDIA NEWS कार्यकारी संपादक श्री तुकाराम सुतार

9604007344

Comments


bottom of page