top of page

२४ वर्षे लष्करी सेवा बजावुन निवृत्त झालेल्या जवानाचे मायभुमीत स्वागत शेंदुर्णी ता.जामनेर

  • Writer: CT India News
    CT India News
  • Feb 8, 2021
  • 1 min read

२४ वर्षे लष्करी सेवा बजावुन निवृत्त झालेल्या जवानाचे मायभुमीत स्वागत

शेंदुर्णी ता.जामनेर

शेंदुर्णी येथील किरण नामदेव गुजर हे लष्कराचे जवान तब्बल २४ वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर ३१ जानेवारी रोजी कोसानी (उत्तराखंड)येथुन निवृत्त झाले. दि.५फेब्रुवारी शुक्रवारी आपल्या मायभुमीत त्यांचे स्वागत व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पो.उप.निरिक्षक किरण बर्गे होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन सपोनि. संजय जगताप मुंबई, शेंदुर्णी ता.मालेगांव चे माजी सरपंच मांगीलाल पवार,शेजवळचे सरपंच आबा चव्हाण, माजी पं.स.सदस्य शांताराम गुजर ,विक्रम गुजर,गुजर सुर्यवंशी समाजाचे अध्यक्ष सुनील गुजर माजी सैनिक वासुदेव गुजर ,अँड. देवेंद्र पारळकर, अकिलोद्दीन काझी,दिपक जाधव,रविंद्र गुजर डॉ. पंकज गुजर व मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त जवान किरण गुजर याचा सत्कार करण्यात आला. शांताराम गुजर,सुनील गुजर,रविंद्र गुजर व अध्यक्ष किरण बर्गे यांनी आपल्या मनोगतात देशसेवेसाठी कार्य करणाऱ्या या आपल्या भुमीपुत्राच्या देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी सर्वांना प्रेरणा असल्याचे सांगितले.

सत्काराला उत्तर देतांना सेवानिवृत्त लष्करी जवान यांनी सांगितले कि,१७जानेवारी १९९७ मध्ये सैन्य दलात भरती झालो.मध्यप्रदेशातील जबलपुर येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर भटिंडा ( पंजाब)कारगिल, मथुरा,दिमापुर (नागालँड) जोथपुर ( राजस्थान )औरंगाबाद,व शेवटी कोसानी ( उत्तराखंड )येथे सेवानिवृत्त झालो असे सांगत देशसेवेच्या दरम्यान आलेले अनुभव, रोमहर्षक, कठीण प्रसंग अनुभव करतांना रोमांच उभे राहिले होते. गावातील व परिसरातील अधिकाधिक युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन करत देशासाठी कार्य करावे असे सांगितले.

सुत्रसंचालन शिवा औटे यांनी तर आभार प्रदर्शन विक्रम गुजर यांनी केले.

Comments


bottom of page