25 दिवसाची भारताकडे पेट्रोल डिझेलच्या साठ्या ची क्षमता इराण आणि अमेरिका इजराइल यांच्या युद्ध मुळे पेट्रोल व डिझेल भडकणार का
Ct india News प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ
इराण आणि अमेरिका इजराइल यांच्या युद्धामध्ये आखाती देशातून येणारे पेट्रोल डिझेल इंधन. इराण देश्याने बंद केले आहे . अशी माहिती सोशल मीडियावर दिसून येत आहे त्यामुळे भारतात होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठा बंद झाल्यास आहाकार माजू शकतो .सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात 36 जिल्यातील मराठवाडा विदर्भात पेट्रोल पंपावर गर्दी पुरेल इतकाच पेट्रोल डिझेलचा साठा भारताकडे असल्याची खात्री दायक माहिती समोर येत आहे . असे बोलल्या जात आहे एवढेच नाही तर पेट्रोल डिझेलचा मोठ्या प्रमाणात साठा करण्याची यंत्रणा सुद्धा भारताकडे नाही अशी ही चर्चा ऐकायला मिळत आहे .चीन कडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिजेलचा साठा नाही परंतु त्यांच्याकडे साठवणूक करण्याची क्षमता भारतापेक्षा जास्त आहे . अखाती क्षेत्रातील युद्ध लांबले तर भारतातच नाही तर संपूर्ण जगा मध्ये तेल संकट निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे .रशियाकडून तेल घेऊ नये यासाठी अमेरिकेने यापूर्वीच भारतावर बंधन लादलेली आहेत .आता आपल्याला रशियाकडून तेल घेण्याची वेळ आलेली आहे .आखाती देशातील युद्ध नाही थांबले तर भारताचे फार मोठे तेल संकट जगावर निर्माण होण्याची शक्यता आहे .अमेरिका आणि इजराइल यांनी संयुक्तपणे इराणचे सर्वेसर्वा व धार्मिक नेता आयातुला अली खामेनेई यांची बॉब हल्ल्यात हत्या केली .हे खामेनेई मरणाच्या भीतीने कुठल्याही बंकर मध्ये लपून बसले नव्हते .स्वतः च्या जीवासाठी इरानी जनतेला उघड्यावर ठेवून आपण बंकर मध्ये लपणे त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी शहादत पत्करली तेच इजराइलचे नेते बेलजामीन नेतन याहू स्वतःचा जीव वाचवत बंकर मध्ये लपत आहेत व सध्या देश सोडून जर्मनीला पळाले आहेत . इरानसाठी करो या मरो परिस्थिति या दोन राष्ट्रांनी निर्माण करून धार्मिक नेते खामेनेई यांना बॉम्ब हल्ल्यात मारले इतकेच नाहीतर शाळेवर बॉम्ब टाकून 160 पेक्षा जास्त मुलींना मारले . आता इरानने आरपारची लढाई लढण्याची शपथ घेवून आखातात असलेल्या अमेरिकी सैनिक ठिकाणाला व इजरायल ला टारगेट करून हल्ले सुरू केले . अमेरिका व इजरायल यांना इरानचे जितके नुकसान करायचे होते तितके त्यांनी केले आता त्या इरान जवळ गमावण्या सारखे कांहीच नाही . पण आत्मघाती ड्रोनच्या व कांही क्षेपणास्त्राच्या साह्याने इरानने अमेरिके सैनिक बेस उडविला .सांगण्याचे तात्पर्य इतकेच आहे की युद्धाची दाहकता वाढत असून जगावर तेल संकट येत असल्यामुळे जगाची अर्थव्यवस्था कोडमोडत आहे .भारतामध्ये एक प्रवाह इजराइलच्या बाजूने आहे तर दुसरा प्रवाह इरानच्या बाजूने .युद्धाने कोणाचेही भले होत नसते फक्त नुकसान होते ! त्यामुळे युद्ध टाळणे हे जगाचा दृष्टीने चांगले असते .ईश्वराने दिलेल्या क्षणभंगुर जीवनात जगाचा जितका विकास करता येईल तितका विकास सर्वांनी केला पाहिजे . पण असे प्रयत्न सोडून बुद्धाच्या देशात (भारतात ) सुद्धा दोन विचार प्रवाह सुरू असल्यामुळे एक प्रवाह इजराइलच्या बाजूने बोलतो तर दुसरा प्रवाह माणुसकीच्या बाजूने ! भारत हे आलेप्ततावादी राष्ट्र असल्यामुळे कधीही युद्धाचे समर्थन केलेले नाही म्हणून भारताने माणुसकीच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे . तसेच सर्वपक्षीय बैठक घेऊन युद्ध थांबविण्यासाठी प्रयत्न केले तर विश्वगुरूची उपाधी लावणे शोभून दिसेल
