महागांव /प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याला जंग

महागांव /प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याला जंग

 

 

Ct india News प्रतिनिधी एस के शब्बीर यवतमाळ

 

 

 

 

 

महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्यासह महागांव तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गरजु लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून घरकुल लाभार्थ्यांचे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अघापही रोजगाराचे योजनेचे पैसे सुद्धा बॅक खात्यात जमा झालेले नाही रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास कोट्यवधी रुपये मंजुर होऊनही लाभार्थ्यांना कोणताही याचा लाभ मिळालेला नाही.त्यामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.त्याच बरोबर अनेक घरकुल लाभार्थ्यांनी कर्जबाजारी काढुन घरकुलाच्या जोत्याचे बांधकाम पूर्ण केले दुसरा हप्ता मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम रखडले आहेत. चौकट लेवल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचे जिओ टाॅकीग होवूनही जवळपास दोन ते तीन महिन्यां अधिक होऊन घरकुलाचे हप्ते मिळत नसल्याने प्रधानमंत्री आवास योजना हि कागदावरच नियमित असल्याचे चित्र दिसून येत आहे.अनेक घरकुल लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार हि योजना राबवित येत आहे या योजनेला आता कुठेतरी जंग लागल्याचे दिसून येत आहे.घरकुल योजनेच्या अल्पशा निधीमध्ये घर बांधने शक्य नाही परंतु आपणास घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून अनेक घरकुल लाभार्थ्यांनी कर्जबाजारी, व्याज दराने काढून सोने,चांदी गहाण ठेऊन घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहेत मात्र शासनाकडून वितरीत होणाऱ्या निधीत विलंब होत असल्याने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांमधुन नाराजीचा पोंगा वाजत आहे घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते कधी खात्यात जमा होणार वारंन वार पंचायत समिती तर कधीं कधीं जिल्हा परिषदेच्या पायऱ्या घरकुल लाभार्थ्यांना सामना करावा लागत आहे.त्यामुळे केंद्र सरकारने व राज्यसरकारने तातडीने घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हप्ते वितरीत बँक खात्यात जमा करण्याची मागणी ( सामाजिक कार्यकर्ते)परेश राठोड वाकान यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *