शेख गफ्फार शेख सत्तार
वारकरी धर्म परिषदेच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी विलास महाराज वाघमारे यांची निवड.
कीर्तनकार,प्रवचनकार वारक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव कार्यतत्पर असणारे हभप विलास महाराज वाघमारे यांची वारकरी धर्म परिषदेच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यागमूर्ती वासुदेव महाराज शास्त्री यांच्या आदेशावरून सर्वानुमते आज ठराव पारित करून नियुक्ती जाहीर करण्यात येत आहे.वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रबोधनकार अँड.सतीशचंद्र रोठे पाटील, उपाध्यक्ष हभप गोपाल महाराज कचोरे, युवाचार्य विदर्भ प्रदेशाध्यक्ष यांच्यासह धर्म परिषदेच्या राष्ट्रीय आणि विदर्भातील प्रमुख पदाधिका-यांच्या प्रमुख उपस्थितीत 19 मार्चला संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते सदर निवड करण्यात आली आहे. हभप वाघमारे महाराजांच्या नियुक्तीमुळे विदर्भातील वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून वारकरी, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
______&___
बुलढाणा :
दिनांक : 20 मार्च 2026
